Soybean Market : अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादनाचा अंदाज युएसडीएनं घटवला

युएसडीएने मार्च महिन्यात अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन २९० लाख टनांवर पोचेल, असा अंंदाज जाहीर केला होता.
Soybean Market
Soybean Market Agrowon

Soybean Rate Update : जागतिक सोयाबीनचा बाजार (Soybean Market) सध्या ब्राझील आणि अर्जेंटीनातील उत्पादनाभोवती फिरतोय. यंदा अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादनात (Soybean Production) निम्म्यानं घट झाली. त्यामुळे बाजारातील समिकरणच बदलली.

अर्जेंटीना आणि ब्राझीलमधील अनेक संस्थांनी यापुर्वी अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादनाचे अंदाज कमी केले. आता अमेरिकेच्या कृषी विभाग अर्थात युएसडीएनेही अर्जेंटीनातील उत्पादनाचा अंदाज कमी केला.

अर्जेंटीनात यंदा भीषण दुष्काळ पडला. त्यामुळं सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली. अर्जेंटीनाचे यंदाचे सोयाबीन उत्पादन गेल्या २३ वर्षांतील निचांकी असेल.

युएसडीएने मार्च महिन्यात अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन २९० लाख टनांवर पोचेल, असा अंंदाज जाहीर केला होता. पण एप्रिलच्या अंदाजात २० लाख टनांची कपात करून २७० लाख टनांवर आणला.

Soybean Market
Soybean Market : देशात अजूनही ७० लाख टन सोयाबीन शिल्लक?

हंगामाच्या सुरुवातीला अर्जेंटीनात ४९० लाख टनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण दुष्काळी स्थिती गंभीर होती गेली तसा उत्पादनाचा अंदाजही कमी करण्यात आला.

अर्जेंटीना आणि ब्राझीलमधील काही संस्थांनी २५० लाख टन उत्पादन होईल, असं म्हटलं. म्हणजेच युएसडीएचा अंदाज यापेक्षा २० लाख टनांनी जास्तच आहे.

अर्जेंटीनातील उत्पादन घटल्यानं सोयाबीन गाळप साडेतीन लाख टनांनी कमी राहणार आहे. यंदा अर्जेंटीनात ३२० लाख टन सोयाबीन गाळप होईल, असा अंदाज युएसडीएनं व्यक्त केला. पण सोयाबीन निर्यातवाढ ३४ लाख टनांवर होईल, असं म्हटलं.

तसचं सोयाबीन आयात ८३ लाख टनांवर पोचेल, असा अंदाज आहे. पण काही संस्थांच्या मते यंदा अर्जेंटीनाला १०० लाख टनांच्या दरम्यान सोयाबीन आयात करावी लागेल.

अर्जेंटीनात उत्पादनात घट झाली तरी ब्राझीलने ही घट भरून काढली. म्हणजेच दक्षिण अमेरिकेतून होणारा सोयाबीन पुरवठा कमी होणार नाही. पण अर्जेंटीनातील उत्पादन घटीचा फायदा ब्राझीलला होताना दिसतोय. यंदा ब्राझीलची सोयाबीन आणि सोयापेंड निर्यात वाढणार आहे. तसेच ब्राझीलच्या सोयाबीनचा सर्वात मोठा ग्राहक चीन असेल.

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात काहीसे चढ उतार सुरु आहेत. आज दुपारी ३ वाजेपर्यंत सोयाबीनचे वायदे १४.९४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडच्या वायद्यांनी ४६२ डाॅलर प्रतिटनाचा टप्पा गाठला होता. सोयाबीन आणि सोयापेंडचे वायदे काहीसे नरमले होते. तर सोयातेलाच्या वायद्यांनीही मान टाकली होती.

Soybean Market
Soybean Seed : घरगुती बियाणे वापरणे का महत्त्वाचे आहे?

देशातील बाजारात सध्या दैनंदीन दोन लाख क्विंटलच्या दरम्यान आवक होते. सोयाबीन आवक कमी दिसत असली तरी सरासरीपेक्षा अधिक आहे. तर बाजारभाव ५ हजार ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान आहेत. देशात सोयाबीनला मागणी टिकून आहे.

सोयापेंडचे सौदे पूर्ण करण्यासाठी प्रक्रिया प्लांट्सची खरेदीही सुरु आहे. त्यामुळं दरात जास्त नरमाई येण्याची शक्यता नाही. काही फंडामेंटल्समुळे बाजारावर दबाव आला तरी तो जास्त दिवस टिकणार नाही.

त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच विक्रीचं नियोजन करावं, असं आवाहन सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी केलंय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com