Cotton Market: कापूस दरवाढीसाठी थोडी वाट पाहावी लागेल

देशातील काही बाजारांमध्ये कापूस दरात आज काहीशी वाढ पाहायला मिळाली. पण शेतकऱ्यांना अपेक्षित दरपातळी आजही झाली नाही. तर आंतरराष्ट्रीय बाजारात चढ उतार सुरुच आहेत.
 Cotton Market
Cotton MarketAgrowon

अनिल जाधव
पुणेः देशातील काही बाजारांमध्ये कापूस दरात (Cotton Rate) आज काहीशी वाढ पाहायला मिळाली. पण शेतकऱ्यांना अपेक्षित दरपातळी आजही झाली नाही. तर आंतरराष्ट्रीय बाजारात (Cotton Rate) चढ उतार सुरुच आहेत.

पण कापूस दर वाढण्याची शक्यता आहे. देशातील बाजारात पुढील काही दिवसांमध्ये दरवाढ दिसेल. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस दरवाढीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल, असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

 Cotton Market
Cotton Market : कापूस बाजारभाव पुन्हा वाढण्याचा अंदाज

आंतरराष्ट्रीय बाजारात आजही कापूस दरात चढ उतार कायम होते. पण आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत कापूस दर वाढतच होते. म्हणजेच कापूस दर आज वाढले. काल कापसाचे वायदे ८२.९६ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते.

क्विंटलमध्ये वायद्यांमधील हा दर १४ हजार ८८४ रुपये होतो. आपल्याला हे माहीतच आहे की वायद्यांमध्ये आपल्या कच्चा कापसाचे नाही तर रुईचे व्यवहार होतात.

आज सायंकाळपर्यंत कापूस वायदे ८४.५२ सेंटपर्यंत वाढले. रुपयात सांगायचं झालं तर हा दर १५ हजार १६४ रुपये होतो.

 Cotton Market
Cotton Market : राज्यातील शेतकऱ्यांनी कापूस विक्री रोखली

आज देशातील काही बाजारांमध्ये कापसाचे भाव काहीसे वाढले होते. काही ठिकाणी दरात क्विंटलमागं १०० ते १५० रुपयांची सुधारणा दिसून आली.

तर काही बाजारांमधील कमाल दरानं म्हणजेच, जास्तीत जास्त दरानं ८ हजार ८०० रुपयांचा टप्पा पार केला. पण अगदी कमी बाजारात असा दर मिळाला.

आजची दरपातळी
पण कापसाचा किमान दर ८ हजार रुपयांपेक्षा जास्त आहेत. तर देशातील सरासरी दरपातळीही किंचित वाढली.

आज कापसाला सरासरी ८ हजार २०० ते ८ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. तसंच राज्यातील दरपातळीही यादरम्यान कायम होती.

दरवाढीचा अंदाज
यंदाही देशातील कापूस उत्पादन घटलं. गेल्या हंगामातील शिल्लक साठाही खूपच कमी आहे. त्यामुळं पुरवठा साखळीत मर्यादीत कापूस उपलब्ध आहे.

शेतकऱ्यांनीही कापूस रोखून धरला. तर दुसरीकडं आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी वाढण्याचा अंदाज आहे.

चीनकडून कापसाला मोठी मागणी येऊ शकते. यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढतील. याचा आधार देशातील बाजारालाही मिळू शकतो.

संभाव्य दरपातळी
पुढील काही दिवसांमध्ये कापूस दर वाढतील. पुढील दोन ते तीन महिन्यापर्यंत कापसाची भाव पातळी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकते.

त्यामुळं शेतकऱ्यांनी ८५०० रुपयांपेक्षा कमी दरात कापूस विकू नये. बाजाराचा आढावा घेऊन विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असं आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com