शेतीमाल बाजारातील चढ-उताराचा अर्थ काय?

कापसाबद्दलच्या (Cotton) चिंतेमध्ये स्थानिक आणि जागतिक पातळीवरील प्रतिकूल हवामानाने भर टाकली आहे. या परिस्थितीमधून कृषिमाल बाजारपेठेमध्ये (Agriculture Market) तेजीचा हा दुसरा टप्पा चालू झाला आहे का याचे उत्तर सध्या कोणाकडे नाही.
Agriculture Commodity
Agriculture CommodityAgrowon

श्रीकांत कुवळेकर

काही राज्यांत सध्या मक्याचे भाव गव्हाशी स्पर्धा करत आहेत. पेरणीतील पिछाडी, अमेरिकेतील प्रतिकूल हवामान, चीनमधील लष्करी अळीच्या वाढत्या प्रभावाबाबतच्या बातम्या यासारख्या बाजार संकेतांमुळे मका अधिक मजबूत होताना दिसत आहेत. तर मागील आठवड्याअखेर सोयाबीनदेखील (Soybean) चार टक्क्यांनी वधारले आहे.

कापसाबद्दलच्या (Cotton) चिंतेमध्ये स्थानिक आणि जागतिक पातळीवरील प्रतिकूल हवामानाने भर टाकली आहे. या परिस्थितीमधून कृषिमाल बाजारपेठेमध्ये (Agriculture Market) तेजीचा हा दुसरा टप्पा चालू झाला आहे का याचे उत्तर सध्या कोणाकडे नाही. परंतु काढणी हंगामापूर्वी बाजार एक उसळी नक्की घेईल, असे बाजार विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

मागील आठवड्याच्या स्तंभात रुपयाच्या विक्रमी घसरणीची शेतकरी वर्गाच्या दृष्टीने चांगली बाजू काय आहे, यावर आपण चर्चा केली होती. तसेच या घसरणीमागचे कारण, अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेची वेगवान आणि विक्रमी व्याजदर वाढ आणि त्याचे कमोडिटी मार्केटवरील परिणाम याचा ऊहापोह आपण केला होता.

Agriculture Commodity
‘Kisan rail: 'किसान रेल्वे`ची महाराष्ट्रात घोडदौड

अमेरिकेत परत एकदा व्याजदरवाढीची शक्यता आणि त्यामुळे लागलेली मंदीची चाहुल यामुळे सर्वच कमोडिटी (Agriculture Commodity) घसरल्या होत्या. त्यातही गहू, मका, सोयाबीन आणि कापूस या आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या पिकांमध्ये तर सर्वात जास्त घसरण झाली होती. त्यामुळे खरीप पिकांच्या काढणीच्या वेळी बाजारावर मंदीचे सावट राहते की काय, अशी शंका व्यक्त केली जात होती.

प्रत्यक्षात अमेरिकी व्याजदर १ टक्क्याऐवजी ०.७५ टक्का एवढेच वाढवले गेले. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बॅंकेच्या अध्यक्षांनी संभाव्य मंदीबाबत आशादायक विधाने केली. त्यामुळे आधीच घसरलेल्या बाजाराला उसळी घेण्यासाठी हवा असलेला ट्रिगर अथवा निमित्त मिळाले. त्यामुळे कमोडिटीबरोबरच शेअर बाजारदेखील जोरदार वाढला.

आठवड्यापुरता विचार केल्यास मक्याने सुमारे १० टक्क्यांची उसळी मारली तर गहू, कापूस आणि सोयातेल यामध्ये ६ ते ८ टक्के एवढी तेजी आली. अर्थात, या तेजीचे मुख्य कारण हे डॉलर इंडेक्समधील मोठी घसरण म्हणजे चलन बाजारातील घडामोड हे होते. बाजारात पुन्हा एकदा ‘फील गुड फॅक्टर’ परत येतोय की काय, असे वाटून आठवड्याअखेर कमोडिटी आणि शेअर बाजार जोरदार तेजीमध्ये बंद झाले.

Agriculture Commodity
Kharif Sowing : भात लागवड क्षेत्रात १३ टक्क्यांची घट

परंतु ही तेजी केवळ मंदीमधील करेक्शन आहे की नव्याने येऊ पाहणारी तेजी याचे उत्तर पुढील तीन आठवड्यांमध्ये मिळेल. कारण फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढ अशीच चालू राहील असेही म्हटले आहे. त्यामुळे सध्याचे वातावरण स्थिरसावर झाले की मंदीचे सावट परत एकदा बाजारात दिसू लागेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. कारण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीदेखील आता मंदीबाबत बोलू लागलेली आहे.

असो. जागतिक घडामोडींमधून राज्यात परतुया. येथील स्थिती वाईटाकडून अधिक वाईटाकडे गेल्याचे चित्र दिसत आहे. खरिपाच्या पेरणीच्या आकड्यांमध्ये झालेल्या वाढीपेक्षा काही भागात अतिवृष्टीने तर काही ठिकाणी पावसाने दडी मारल्याने वाया गेलेल्या पिकाच्या क्षेत्राची आकडेवारी अधिक वेगाने वाढलेली दिसून आली आहे. महाराष्ट्रामध्ये अधिकृतपणे २५ लाख एकरांवर पिकांचे २५-७५ टक्के नुकसान दिसत आहे. काही पिके दुबार आणि तिबार पेरणीमध्ये आहेत. पिकांमध्ये बदल करण्याला मर्यादा आहेत. कारण जुलै महिना आज संपत आहे.

Agriculture Commodity
FCI: तेलंगणात तांदूळ प्रक्रियेसाठी मुदतवाढ

भात, ऊस, कापसाची आकडेवारी नाही

देशातील पीकपेरण्याची स्थितीही ठीकठाक नाही. भात हे देशातील प्रमुख खरीप पीक आहे. खरीप हंगामात इतर पिकांच्या तुलनेत भाताचे लागवडक्षेत्र सर्वाधिक असते. देशाच्या अन्नसुरक्षेसाठी भात पिकाचे महत्त्व मोठे आहे. परंतु देशात सध्या भात पेरणीची आकडेवारी कुठेच आश्‍वासक नाही.

याची कल्पना सरकारलाही आहे. त्याचे प्रतिबिंब मागील शुक्रवारअखेर प्रसिद्ध केलेल्या खरीप पीक पेरणी अहवालात पडलेले स्पष्ट दिसत आहे. कारण १५ दिवसांपूर्वी अगदी १७ टक्के पिछाडीवर असलेल्या भाताच्या लागवडक्षेत्राची आकडेवारीच मागील दोन आठवडे देण्यात आलेली नाही. तसेच ऊस आणि कापूस या पिकांनाही साप्ताहिक पीकपेरणी अहवालातून वगळले आहे.

कडधान्यांबाबत बोलायचे तर तुरीचे क्षेत्र वाढले असले तरी आठवड्याभरात पिछाडी २० टक्क्यांवरून १४ टक्क्यांवर एवढेच म्हणता येईल. राजस्थानमधील पेरण्या वाढल्याचा फायदा मुगाला मिळाला आहे. तर तेलबियांमध्ये भुईमूग अजून नऊ टक्के पिछाडीवर आहे. सोयाबीनने दोन-तीन टक्क्यांची घेतलेली आघाडी फसवी असल्याचे बाजार धुरीणांचे म्हणणे आहे.

पीक नुकसानीचे क्षेत्र पकडल्यास सोयाबीनच्या बाबतीत पिछाडी आणि उत्पादकतेमध्ये घट निश्‍चित मानली जात आहे. मक्यामध्ये पेरण्यांमध्ये पाच टक्के पिछाडी असली, तरी दुबार आणि तिबार पेरणीनंतर कदाचित सुधारणा दिसू शकते. गेल्या वर्षीच्या मका लागवडीशी बरोबरी किंवा थोडी आघाडी शक्य आहे. मात्र याबरोबरच खरीप काढणी हंगाम महिन्याभराने तरी पुढे ढकलला जाणार, असे सध्याचे चित्र आहे.

बाजार एक उसळी घेणार?

वरील सगळ्या परिस्थितीवरून कृषिमाल बाजारपेठेसाठी ‘ऑल इज नॉट वेल' हेच ठळकपणे दिसून येत आहे. तसेच पीकनुकसानीमुळे भाजीपाला आणि फळांच्या पुरवठ्यात झालेली कपात आणि येत्या काळातील सणासुदीचे दिवस यामुळे कडधान्यांना मागणी वाढेल, यात शंका नाही. काही राज्यांत सध्या मक्याचे भाव गव्हाशी स्पर्धा करत आहेत.

पेरणीतील पिछाडी, अमेरिकेतील प्रतिकूल हवामान, चीनमधील लष्करी अळीच्या वाढत्या प्रभावाबाबतच्या बातम्या यासारख्या बाजार संकेतांमुळे मका अधिक मजबूत होताना दिसत आहेत. तर मागील आठवड्याअखेर सोयाबीनदेखील चार टक्क्यांनी वधारले आहे. कापसाबद्दलच्या चिंतेमध्ये स्थानिक आणि जागतिक पातळीवरील प्रतिकूल हवामानाने भर टाकली आहे. या परिस्थितीमधून कृषिमाल बाजारपेठेमध्ये तेजीचा हा दुसरा टप्पा चालू झाला आहे का याचे उत्तर सध्या कोणाकडे नाही. परंतु काढणी हंगामापूर्वी बाजार एक उसळी नक्की घेईल, असे बाजार विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

जागतिक बाजारात उसळी

  • - जागतिक बाजारात मक्याची सुमारे १० टक्के उसळी.

  • - गहू, कापूस आणि सोयातेल यामध्ये सुमारे ६ ते ८ टक्के तेजी.

  • - चलन बाजारातील घडामोडींमुळे तेजी.

  • - अमेरिकेत फेडरल रिझर्व्ह बॅंकेने व्याजदर वाढ चालू राहण्याचे संकेत दिल्याने मंदीचे सावट पुन्हा येण्याची शक्यता.

  • - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडूनही मंदीबाबत भाष्य.

देशातील चित्र

  • - कडधान्यांची मागणी वाढणार.

  • - मका अधिक मजबूत होणार.

  • - सोयाबीन दरामध्ये चार टक्क्यांची वाढ.

  • - कापसाला प्रतिकूल हवामानाचा फटका बसण्याची शक्यता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com