Cotton Market : काय आहे कापसाचा फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरिन प्रकल्प?

महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये उभारणार प्रकल्प; ७० हजार कोटींची गुंतवणूक, २० लाख रोजगार निर्मिती होणार
Cotton Market
Cotton Market Agrowon

Cotton Rate : सरकारने वस्त्रोद्योग उद्योगासाठी सात पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रीजन्स अँड अपारेल अर्थात पीएम मित्र पार्क उभारण्यासाठीच्या राज्यांची घोषणा केली.

या पार्कची उभारणी महाराष्ट्रासह तामिळनाडू, तेलंगण, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात होणार आहे.

फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या ५ एफ या दृष्टिकोनापासून हे पार्क प्रेरित आहे. भारताला वस्त्रोद्योग आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनवण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाला प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

या पार्कमुळे अर्थव्यवस्था विकसित होण्याबरोबरच भारतातील उत्पादन क्षेत्राकडे जागतिक उद्योगांना आकर्षित करण्यासाठी मदत मिळेल. त्यामुळे वस्त्रोद्योग उद्योगात स्पर्धात्मकता वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Cotton Market
Cotton Market : कापूस उत्पादनात आणखी घट; दर वाढतील का?

पीएम मित्र प्रकल्पासाठी तेरा राज्यांकडून प्राप्त झालेल्या 18 प्रस्तावांपैकी सात प्रकल्पस्थळांची निवड करण्यात आली आहे.

पात्र राज्ये आणि प्रकल्पस्थळांचे मूल्यांकन कनेक्टिव्हिटी, सध्या अस्तित्वात असलेली परिसंस्था, वस्त्रोद्योग/ उद्योग धोरण, पायाभूत सुविधा, वापराच्या सेवा इत्यादी विविध घटकांना विचारात घेऊन या संदर्भातील बहुपर्यायी निकषांवर निवड करण्यात आळी.

पीएम मित्र पार्क जागतिक दर्जाच्या औद्योगिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मदत करतील, ज्यामुळे थेट परदेशी गुंतवणुकीसह इतर प्रकारची गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होईल आणि या क्षेत्रातील नवोन्मेष आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळेल, असे सरकारने स्पष्ट केले.

पुरेसा निधीही देणार

वस्त्रोद्योग मंत्रालय या प्रकल्पावर देखरेख ठेवेल. प्रत्येक पार्कसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून एका एसपीव्हीची म्हणजेच विशेष कंपनीची उभारणी करण्यात येईल, जे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवेल.

वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून प्रत्येक एसपीव्हीला विकास भांडवल सहाय्य म्हणून प्रतिपार्क ५०० कोटी रुपयांपर्यंतचे आर्थिक साहाय्य मिळेल. अंमलबजावणी वेगाने व्हावी यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी पीएम मित्र पार्कमधील युनिटसाठी देखील प्रतिपार्क ३०० कोटी रुपयांपर्यंत स्पर्धात्मक प्रोत्साहननिधी पाठबळ दिले जाईल.

गुंतवणूक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी अतिरिक्त प्रोत्साहननिधी उपलब्ध करून देण्यासाठी इतर सरकारी योजनांशी संलग्न करण्याची परवानगी देण्यात येईल.

Cotton Market
Cotton Market : कापूस विक्रीचं नियोजन यंदाही चुकलं का?

पायाभूत सुविधा राज्य सरकार देतील

या प्रकल्पांसाठी राज्य सरकारे सलग आणि कोणताही भार नसलेली किमान १००० एकर जमीन उपलब्ध करून देतील. आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या सुविधा पुरवतील.

खात्रीशीर वीज पुरवठा, पाणी पुरवठा, सांडपाणी विल्हेवाट प्रणाली, प्रभावी एक खिडकी मंजुरी प्रणाली त्याचबरोबर पोषक आणि स्थिर वस्त्रोद्योग धोरणही राबवेल. उद्योगांसाठी हे पार्क्स अतिशय उत्तम पायाभूत सुविधा, प्रशिक्षण आणि संशोधन या सुविधा उपलब्ध करून देतील.

२० लाख रोजगार उपलब्ध होईल

पीएम मित्र पार्क एक वैशिष्ट्यपूर्ण मॉडेल सादर करत आहे. ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारे गुंतवणूक वाढवण्यासाठी, इनोवेशनला प्रोत्साहन देण्यासाठी, रोजगाराच्या संधीत वाढ करण्यासाठी आणि भारताला वस्त्रोद्योग उत्पादनाचे आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनवण्याचे सर्वोच्च उद्दीष्ट साध्य करण्यासाठी एकत्र काम करतील.

या पार्कच्या माध्यमातून सुमारे ७०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि २० लाख रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे, असेही केंद्राने स्पष्ट केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com