Tur Market : तुरीच्या दराती स्थिती काय?

देशातील बाजारात सध्या तुरीची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे तुरीचे दर तेजीत आहेत. आता आफ्रिकेतील देशांमध्ये नवी तूर बाजारात आली.
Tur Market
Tur MarketAgrowon

पुणेः देशातील बाजारात सध्या तुरीची (Tur Market) टंचाई जाणवत आहे. त्यामुळे तुरीचे दर तेजीत आहेत. देशातील नवीन तुरीची आवक डिसेंबर महिन्यापासून सुरु होईल. सध्या शेतकऱ्यांकडे तूर नाही त्यामुळे बाजारातील आवकही कमी आहे. त्यामुळे सध्या तुरीला ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय.

देशातील बाजारात सध्या तुरीची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे तुरीचे दर तेजीत आहेत. आता आफ्रिकेतील देशांमध्ये नवी तूर बाजारात आली. त्यामुळे सरकारने आयात तूर खरेदीचा निर्णय घेतला. मात्र सरकारला तूर खरेदीत फार मोठं यश मिळताना दिसत नाही. सरकार जवळपास एक लाख टन तूर खरेदी करणार आहे. मात्र आफ्रिकेतून आयात होणाऱ्या तुरीला देशात जास्त उठाव मिळत नाही. तसेच या तुरीवर प्रक्रिया करणे आवघड जाते. प्रक्रिया करताना माल जास्त वाया जातो. त्यामुळे या तुरीचे दरही जास्त असतात.

Tur Market
Market Committee : नांदगाव बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालाचे हाल

देशातील तूर उपलब्धतेचा बाजारावर सध्या परिणाम होत आहे. देशातील महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील बाजारात तुरीचे दर मागील काही महिन्यांपासून स्थिर आहेत. तर बाजारातील आवक मात्र कमी आहे. यामुळे तुरीला दिवाळीनंतर उठाव कमी असला तरी दर टिकून आहेत.

सध्याची भावपातळी काय?
सध्या देशात तुरीला प्रतिक्विंटल ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. महाराष्ट्रातील दर ७ हजार १०० ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. तर कर्नाटकातील दरही ६ हजार ८०० ते ७ हजार ९०० रुपयांवर स्थिर आहे. लाल तूर सध्या ७ हजार ते ७ हजार ८०० रुपयाने विकली जात आहे. तर लेमन तुरीचा भाव ७ हजार ३०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत.  

काय आहे अंदाज?
सध्या शेतकऱ्यांकडे तूर नाही. त्यामुळे बाजारातील आवकही कमी आहे. नवी तूर डिसेंबरपासून बाजारात येण्यास सुरुवात होईल. तोपर्यंत आयात आणि उपलब्ध साठ्यावरच गरज भागवावी लागेल. त्यातच यंदा तुरीचं उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तुरीच्या दरातील तेजी कायम राहील, असा अंदाज प्रक्रियादारांनी व्यक्त केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com