पंजाबमधील गव्हाची २० टक्के प्रत खालावली

हा आकसलेला गहू सरकारी खरेदी योजनेतील निकष पूर्ण करू शकतो अथवा नाही याबाबतचा निर्णय केंद्र सरकारकडून घेतला जाणार आहे. तत्पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांनी आणि राज्य सरकारनेही सरकारी खरेदीतील निकष शिथिल करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती.
Wheat grain
Wheat grainAgrowon

उष्णतेच्या लाटेचा फटका बसून पंजाबमधील गव्हाचे २० टक्के नुकसान झाले आहे. नुकसानीची पाहणी करणाऱ्या केंद्रीय पथकांनी याबाबतचा एक सविस्तर अहवाल केंद्र सरकारकडे सुपूर्त केला आहे.

उष्णतेची लाट, कोरड्या हवेच्या माऱ्यामुळे यंदा पिके आकसण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात यंदा एकरी उत्पादनातही मोठी घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पाच पथकांकडून राज्यातील पिकांची पाहणी करण्यात आली आहे. या पथकांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील पिकांचे नमुने संकलित केले होते. प्रयोगशाळांमधील तपासणी अंती उष्णतेच्या लाटेचा फटका बसल्याचे मान्य केले आहे. या पथकांनी आपला अहवाल केंद्र सरकारकडे सोपवला आहे.

Wheat grain
पंजाबमधील शेतकऱ्यांना मिळणार डिजिटल पोचपावती

पंजाब कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार पंजाबमध्ये यंदा ३५ लाख हेक्टर क्षेत्रात गव्हाची लागवड करण्यात आली आहे. यंदा एकरी १८०० किलो ग्रॅम उत्पादनाचा अंदाज आहे. गेल्यावर्षी राज्यात ३५.५० लाख हेक्टर क्षेत्रात गव्हाची लागवड करण्यात आली होती. एकरी उत्पादनाचे प्रमाण १९४० किलो ग्राम असे होते. यावर्षी पिकांचे एकरी उत्पादन २०० ते ३०० किलोने घटण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

हा आकसलेला गहू सरकारी खरेदी योजनेतील निकष पूर्ण करू शकतो अथवा नाही याबाबतचा निर्णय केंद्र सरकारकडून घेतला जाणार आहे. तत्पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांनी आणि राज्य सरकारनेही सरकारी खरेदीतील निकष शिथिल करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती.

Wheat grain
जुलैपासून पंजाबमधील जनतेला मोफत वीज !

सरकारी खरेदी केंद्रावर ६ टक्क्यांपर्यंत आकसलेला गहू हमीभावाने खरेदी करण्यात येतो. मात्र आता उष्णतेचा फटका बसल्याने काही जिल्ह्यांतील गव्हातील आकसण्याचे प्रमाण १० ते १५ टक्के भरले आहे. तर काही जिल्ह्यांत २० टक्क्यांपर्यंत गहू आकसला असल्याचे केंद्रीय पथकांच्या पाहणीत समोर आले आहे.

दरम्यान उत्पादकता घटल्याने आर्थिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मालाला हमीभावाचा लाभ देण्यात यावा. त्यासाठी सरकारी खरेदीचे निकष शिथिल करण्यात यावेत, अशी विनंती राज्य सरकारने केंद्राला केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com