यंदा देशात गव्हाचे विक्रमी उत्पादन होणार!

पंजाब आणि हरियाणातील उष्णतेच्या लाटेमुळे गहू उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जी.पी. सिंग यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना ही शक्यता फेटाळून लावली. यंदा देशभरात गव्हाचे उत्पादन १११ दशलक्ष टनांवर जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
Wheat Production
Wheat ProductionAgrowon

यंदा देशातील गव्हाचे उत्पादन (Wheat Production) १११ दशलक्ष टनांवर जाईल, असा अंदाज कर्नाल येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हीट अँड बार्ली रिसर्चचे (IIWBR) संचालक जी.पी. सिंग यांनी व्यक्त केला आहे.

पंजाब आणि हरियाणातील उष्णतेच्या लाटेमुळे गहू उत्पादनात (Wheat Production) घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जी.पी. सिंग यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना ही शक्यता फेटाळून लावली. यंदा देशभरात गव्हाचे उत्पादन १११ दशलक्ष टनांवर जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Wheat Production
भारताची गहू निर्यात १०० लाख टनांवर ?

गेल्या काही आठवड्यांत पंजाब आणि हरियाणामधील काही भागांत अचानक तापमानात वाढ झाली आहे. ज्यामुळे काही ठिकाणी गव्हाचे पीक काही प्रमाणात आकसले असल्याचे सिंग म्हणाले आहेत.

Wheat Production
पंजाबमधील गव्हाची २० टक्के प्रत खालावली

ज्या भागात गव्हाची लागवड वेळेवर झाली आहे अशा ठिकाणी हे प्रकार झाले नाहीत. उशिराने लागवड झालेल्या पिकाला काही अंशी या बदलत्या हवामानाचा फटका बसला आहे. होळीनंतर तापमानात वाढ झाली. विशेषतः मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात तापमानात अधिक वाढ झाली. मात्र तोपर्यंत वेळेवर लागवड झालेले पीक पूर्णतः परिपक्व झाले होते. उशिराने लागवडी झालेल्या पिकाला मात्र फटका बसल्याचे सिंग म्हणाले आहेत.

पंजाब आणि हरियाणापुरताच हा प्रकार घडल्याचे सांगताना सिंग यांनी उत्पादनात घट होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. आपण मध्यप्रदेशात अनेक ठिकाणी पाहणी केलेली आहे. तिथे उष्णतेच्या लाटेचा कसलाही परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे आपण यापूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार देशाचे गहू उत्पादन (Wheat Production)१११ ते ११२ दशलक्ष टनांवर जाण्यास काहीच हरकत नाही. हे उत्पादन यंदा विक्रमी स्वरूपाचे असेल, असेही सिंग म्हणाले आहेत.

Wheat Production
हे वर्ष खाद्यान्न महागाईचेच !

दरम्यान २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात देशभरात गव्हाचे उत्पादन विक्रमी अशा १११.३२ दशलक्ष टनांवर जाईल, असा अंदाज फेब्रुवारीमध्ये केंद्रीय कृषी मंत्रालयाने व्यक्त केला होता. हा त्यांचा दुसरा अंदाज होता. केंद्रीय कृषी मंत्रालयाचा तिसरा अंदाज लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. २०२०-२०२१ मध्ये देशाचे गहू उत्पादन (Wheat Production) १०९.५९ दशलक्ष टन होते. चालू आर्थिक वर्षात सरकारने ११० दशलक्ष टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले होते.

२०२१-२०२२ च्या रब्बी हंगामात ३४३.२ लाख हेक्टर क्षेत्रात गव्हाची (Wheat Cultivation) लागवड करण्यात आली. २०२०-२०२१ च्या रब्बी हंगामात ३४६.०९ लाख हेक्टर क्षेत्रात गव्हाची लागवड करण्यात आली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कमी क्षेत्रात गव्हाची लागवड करण्यात आली. यंदा मध्य प्रदेश, बिहारमधील गहू लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे नोंदवण्यात आले, तर पंजाब, राजस्थान, हरियाणात गहू लागवड क्षेत्रात घट झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान रशिया-युक्रेन संघर्षामुळे (Russia-Ukraine crisis)जगातील अनेक देशांचा पुरवठा गहू खंडित झाला आहे. त्यामुळे भारतीय गव्हाला मागणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com