Cotton Market : कापूस दरातील नरमाई कधी थांबेल?

Cotton Rate : देशातील बाजारावरील दबाव वाढत आहे. कमी होणारे भाव आणि वाढती आवक यामुळे बाजार कमी होत गेला.
Cotton Market
Cotton MarketAgrowon

Cotton Arrival : देशातील बाजारावरील दबाव वाढत आहे. कमी होणारे भाव आणि वाढती आवक यामुळे बाजार कमी होत गेला. सध्या कापसाला अनेक बाजारांमध्ये हमीभावाच्या दरम्यान भाव मिळत आहे. यंदा उत्पादन कमी आहे.

त्यामुळे पुढील हंगामासाठी शिल्लक साठा खूपच कमी असेल. हवामान विभागानेही माॅन्सून काळात कापूस भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

देशातील बाजारात कापसाच्या दरावरील दबाव कायम आहे. कापसाच्या भावाने अनेक बाजारांमध्ये आता ६ हजार ५०० रुपयांचा टप्पा गाठला. परदड कापसाचे भाव आता हमीभावाच्या दरम्यान पोचले.

फरदड कापसाला ६ हजारांपासून भाव मिळत आहेत. कापसाचे भाव दबावात असतानाही आवक जास्त आहे. त्यामुळे कापसाचे भाव आणखी कमी होत आहेत, असे व्यापारी सांगत आहेत.

खरिपाचा हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग सुरु केले. भाव कमी होत असतानाही आवक वाढतच राहीली. त्यामुळे कापसाच्या भावाने निचांकी टप्पा गाठला. काही ठिकाणी कापसाचे भाव हमीभावाच्या दरम्यान पोचले आहेत.

Cotton Market
Cotton Market : कापूस दर हमीभाव पातळीकडे

कापसासोबतच सरकी आणि सरकीचे भावही कमी झाले. खाद्यतेल बाजारात नरमाई आहे. सोयाबीन आणि सूर्यफुल तेलाचे भाव कमी झाले. त्यामुळे सरकी तेलालाही फटका बसला. सरकी पेंडेचेही दरही सध्या दबावात आहेत. यामुळे कापूस दरावर आणखी दबाव वाढला.

सध्या कापसाला सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार ४०० रुपयांचा भाव मिळत आहे. तर आवक गुजरात आणि महाराष्ट्रात जास्त आहे. आवकेचा दबाव आणखी काही दिवस दिसू शकतो.

देशातील बाजारात आजही कापसाची आवक एक लाख गाठींच्या दरम्यान झाली. कापसाची आवक जास्त असल्याचा दबाव वाढत आहे. राज्यात यंदा माॅन्सून उशीरा दाखल होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे लागवडीला काहीसा अवकाश मिळेल.

पण शेतीमाल विकल्याशिवाय अनेक शेतकऱ्यांना पर्याय नसतो. हे शेतकरी सध्या कापूस विकत आहेत. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर लगेच लागवडी करता याव्या यासाठी ही तजवीज सुरु असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

खरिप हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असतो. यंदा एल निनोच्या स्थितीमुळे खरिपाला आणखी महत्व आलं. पेरणीसाठी शेतकरी कापूस विकत आहेत. हा कापूस पुढील काही दिवसांमध्ये बाजारात येईल. शेतकऱ्यांची नड भागल्यानंतर पडलेल्या भावात कापूस बाजारात येणार नाही.

तसेच पुढील हंगामातील उत्पादनाबाबत काहीशी चिंताही व्यक्त केली जात आहे. चित्र जून महिन्यात आणखी स्पष्ट होण्यास मदत होईल.

Cotton Market
HTBT Cotton : गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांत अवैध ‘एचटीबीटी’चे दलाल सक्रिय

हवामान विभागाने आज माॅन्सून काळातील पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. या अंदाजात महाराष्ट्रासह काही राज्यांतील कापूस उत्पादक भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता जास्त दिसते. तसेच जून महिन्यात देशात कमी पावसाचा अंदाज आहे.

त्यामुळे लागवडीला उशीर झाला किंवा कमी पाऊस झाला तर कापूस पिकावर परिणाम दिसू शकतो. पहिल्या टप्प्यात कापूस पिकाला फटका बसल्यास कापूस बाजारालाही आधार मिळू शकतो. कारण यंदा पुढील हंगामासाठी शिल्लक साठा मागील ४० वर्षांतील निचांकी पातळीवर असेल, असे जाणकारांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com