Soybean Market : सोयाबीनमधील मंदी थांबणार की नाही?

चांगल्या दराच्या अपेक्षेनं यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन मागं ठेवलं होतं. नोव्हेंबर महिन्यात दरानं ६ हजारांचा टप्पा गाठलाही. पण त्यानंतर दरात घट होत गेली.
Soybean Market
Soybean MarketAgrowon

पुणेः देशातील बाजारात सोयाबीन दरातील नरमाई (Soybean Rate) कायम आहे. बाजारातील आवकही वाढली. सोयाबीनचे दर (Soybean Market)  जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कमी होत गेले.

शेतकरी तेव्हापासून दरवाढीची वाट पाहत आहेत. आंतरराष्ट्रीय  बाजारात सोयाबीन दरात मोठे चढ उतार झाले. पण देशातील बाजारात नरमाई कायम होती.

पण मागील आठवड्यापासून दरातील नरमाई वाढली. पण सोयाबीन (Soybean Bajarbhav) दरातील ही नरमाई जास्त दिवस राहणार नाही, असं जाणकारांनी सांगितलं.

चांगल्या दराच्या अपेक्षेनं यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन मागं ठेवलं होतं. नोव्हेंबर महिन्यात दरानं ६ हजारांचा टप्पा गाठलाही. पण त्यानंतर दरात घट होत गेली.

अनेकदा दरवाढीसाठी शक्यताही निर्माण झाली. पण सोयाबीनचा खरेदीदर वाढला नाही. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात काहीशी वाढ झाली. पण काही दिवसांमध्येच दरपातळी पुन्हा नरमली.

जानेवारीत सोयाबीनची दरवाढ कायम राहील, अशी आशा होती. पण सरकारच्या धोरणामुळं बाजारातील परिस्थिती बदलली. सरकारनं खाद्यतेल आयातीला मोकळ रान केलं.

खाद्यतेल आयातीवरील शुल्क कमी केलं. सोयाबीनतेलाची शुल्कमुक्त आयात केली. त्यामुळं देशात खाद्यतेलाचा मोठा साठा निर्माण झाला. याचा दबाव सोयातेलावर आला.

सोयापेंडमुळं गाळप वाढलं

दुसरीकडं सोयापेंडला मागणी आहे. आवक वाढल्यानं प्रक्रिया प्लांट्सना सोयाबीनही मोठ्या प्रमाणात मिळत आहे. त्यामुळं सोयाबीनचं गाळप केलं जात आहे.

म्हणजेच सोयातेलाचं उत्पादनही दुसरीकडं वाढत आहे. याचा आणखी दबाव सोयाबीन तेलावर येत आहे. यामुळं सोयातेलाचे दर कमी झाले. याचा दबाव सध्या सोयाबीन दरावर जाणवत असल्याचं सांगितलं जातं.

Soybean Market
Cotton Soybean Market : कापूस, सोयाबीन दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चा मानवतमध्ये मोर्चा

आयातशुल्क वाढण्याचा अंदाज

केंद्र सरकार आता खाद्यतेल आयातीवरील शुल्क वाढवण्याचा अंदाज आहे. असे झाल्यास देशातील सोयातेलाचे दरही वाढू शकतात. कारण सोयापेंडला चांगली मागणी आहे. सोयातेलाचे दर वाढल्यास सोयाबीनलाही आधार मिळेल, असं प्रक्रियादारांनी सांगितलं.

दर वाढतील

सध्या बाजारात सोयाबीनची आवक वाढली. त्यामुळं सोयाबीनचे दर दबावात असले तरी हा दबाव कायम राहणार नाही. त्यामुळं शक्य असल्यास शेतकऱ्यांनी विक्रीसाठी थांबावं.

पुढील काळात सोयाबीनला सरासरी ५ हजार ५०० ते ६ हजार रुपयांपर्यंत दर मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com