Cotton Market : कापूस बाजारात चढ उतार का आले?

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात रोज चढ उतार सुरु आहेत. देशातील बाजारात सध्या कापूस दरातही दरपातळी बदलताना दिसते. पण सरासरी दरपातळी कायम आहे.
Cotton Market
Cotton MarketAgrowon

Cotton Rate Update : आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात (Cotton Rate) रोज चढ उतार सुरु आहेत. देशातील बाजारात सध्या कापूस दरातही दरपातळी बदलताना दिसते. पण सरासरी दरपातळी कायम आहे. कापसाचे दर मागील आठवड्यात वाढले होते.

पण दरात पुन्हा काहीशी नरमाई आली. मात्र याच काळात बाजारातील कापसाची आवक (Cotton Arrival) अधिक आहे.

देशात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कापसाचे भाव दबावात होते. शेतकऱ्यांनी दरवाढीची वाट पाहून बहुतेक कापूस या दोन महिन्यात विकला. त्यामुळं एप्रिलमध्ये कापसाचा साठा कमी होता. त्यामुळं कापूस दरात क्विंटलमागं ३०० ते ४०० रुपयांची सुधारणा झाली.

कापसाचे भाव सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांवर पोचले होते. दरात सुधारणा दिसल्याने शेतकऱ्यांनी विक्री कायम ठेवली. परिणामी अनेक बाजारांमध्ये आवकेचा दबाव आला. चालू आठवड्यात काही बाजारांमध्ये तर चालू हंगामातील कमाल आवक झाली.

Cotton Market
Cotton Market : कापसाला कमाल दर ८०५० रुपये

बाजारातील आवक कायम होती. त्यातच पाऊस सुरु झाला. पुढील महिन्यात कापसाच्या आगाप लागवडी सुरु होतील. त्यामुळं शेतकरी कापूस विकत असल्याचे व्यापारी सांगतात. पण बाजारात आवक वाढल्यानं दरात पुन्हा नरमाई आली.

अनेक बाजारांमध्ये दर क्विंटलमागं २०० रुपयांनी कमी झाले होते. देशातील बहुतांशी बाजारात कापसाचे भाव आज ७ हजार ८०० ते ८ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान होते. आज काही बाजारांमध्ये कापूस दरात पुन्हा १०० ते १५० रुपयांची सुधारणा झाली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात मागील आठवड्यात कापूस दरात चढ उतार राहीले. पण सरासरी दरपातळी कायम दिसली. कापसाचे वायदे शुक्रवारी ८२.९८ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. जागतिक पातळीवर सध्या आर्थिक मंदी आहे.

त्यामुळं कापडाला उठाव कमी असल्याचं उद्योगांकडून सांगितलं जातं. चीन आणि बांगलादेशच्या कापडाला मागणी नाही, तसचं बांगलादेशला कापसाची टंचाई भासते. त्यामुळं भारताला कापड निर्यातीचीही संधी असल्याचं जाणकारांनी सांगितलं.

Cotton Market
Cotton Market : देशातील कापूस लागवड यंदाही वाढेल का?

देशात सध्या कापसाचा कमी साठा बाजाराच्या बाहेर आहे. पुढील काही दिवसांमध्ये बहुतांशी कापूस बाजारात येईल. अगदी मोजके शेतकरी कापूस ठेवतील. त्यावेळी दरात सुधारणा होऊ शकते. त्यातच देशातील उद्योगांची क्षमता वाढली आहे.

सुतगिरण्याही नफ्यात काम करत आहेत. त्यामुळं कापसाचा वापर वाढलेला दिसतो. तसेच भारताची कापड निर्यातही अधिक राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं पुढील काळात कापूस दर सुधारतील. पण शेतकऱ्यांनी कापसाची विक्री करताना बाजाराचा आढावा घ्यावा. कापूस दराची शहानिशा करूनच विक्री करावी, असं आवाहन कापूस बाजारातील जाणकारांनी केलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com