Soybean Market : सोयाबीन बाजार का स्थिरावला?

सोयाबीन बाजारात सध्या काहीसे चढ उतार सुरु आहेत. ब्राझीलचं उत्पादन यंदा विक्रमी पातळीवर पोचणार आहे. तर अर्जेंटीनातील उत्पादन घटीमुळे निर्माण झालेली पोकळी ब्राझील यंदा भरुन काढेल.
Soybean Market
Soybean Market Agrowon

Soybean Rate : सोयाबीन बाजारात (Soybean Market) सध्या काहीसे चढ उतार सुरु आहेत. ब्राझीलचं उत्पादन यंदा विक्रमी पातळीवर पोचणार आहे. तर अर्जेंटीनातील उत्पादन घटीमुळे निर्माण झालेली पोकळी ब्राझील यंदा भरुन काढेल. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात चढ उतार असले तरी सरासरी दरपातळी वाढलेली दिसते.

ब्राझीलमध्ये यंदा सोयाबीन उत्पादन विक्रमी पातळीवर पोचणार आहे. तर अर्जेंटीनातील उत्पादन निम्म्यावर आलं. त्यामुळं ब्राझीलचं उत्पादन विक्रमी होऊनही दर टिकून आहेत. चालू हंगामात सोयाबीनचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात सतत १५ डाॅलरच्या पुढे आहेत.

सोयापेंडचे दरही पूर्वपातळीकडे जात आहेत. मात्र खाद्यतेल बाजारातील नरमाईमुळं सोयातेलावरही दबाव दिसतो. त्यामुळं सोयातेलाचे दर अपेक्षेपेक्षा कमी आहेत. याचा परिणाम सोयाबीन बाजारावरही दिसतो आहे.

Soybean Market
Soybean Market : देशात अजूनही ७० लाख टन सोयाबीन शिल्लक?

ब्राझीलमध्ये यंदा सोयाबीन उत्पादन वाढणार आहे. ब्राझिलियन असोसिएशन ऑफ व्हेजिटेबल ऑईल इंडस्ट्रीने यंदा ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन १८.२ टक्क्यांनी वाढणार आहे. यंदा उथ्पदान १ हजार ५३६ टनांवर स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त केला.

तर दुसरीकडे अर्जेंटीनातील उत्पादन घटले. त्यामुळे ब्राझीलला केवळ सोयाबीन निर्यातीच नाही तर सोयापेंड आणि सोयातेल निर्यातीचीही संधी निर्माण झाली.

यंदा ब्राझीलच्या सोयाबीनला चीन आणि इतर आशियातील देशांकडून चांगली मागणी आहे. त्यामुळं यंदा ब्राझीलमधून विक्रमी सोयाबीन निर्यात होणार आहे. यंदा ब्राझील मागीलवर्षीपेक्षा १९ टक्के जास्त निर्यात करेल. यंदा सोयाबीन निर्यात ९३७ लाख टनांचा टप्पा गाठेल. तर सोयापेंड निर्यातही १४ लाख टनांनी वाढून २१० लाख टनांवर पोचेल, असा अंदाजही असोसिएशनने व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय बाजारात यंदा अर्जेंटीनातून कमी सोयापेंड आणि सोयातेल येईल. याचा फायदा घेण्यास ब्राझील तयार आहे. यंदा ब्राझीलमधील सोयाबीन गाळप १७ लाख टनाने वाढून ५२५ लाख टनावर पोचेल. तर सोयापेंड उत्पादन ४ टक्क्यांनी वाढून ४०२ लाख टनांचा टप्पा गाठेल. सोयातेल निर्मितीही १०७ लाख टनांवर पोचणार आहे, असा अंदाजही या असोसिएशनने व्यक्त केला.

ब्राझीलने यंदा जैवइंधनात सोयातेलाचा वापर वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं ब्राझीलची सोयातेलाची मागणी वाढेल. गेल्या हंगामात ब्राझीलमध्ये ७१ लाख टन सोयातेलाचा वापर झाला होता. तो यंदा ८९ लाख टनांवर पोचेल. त्यामुळं सोयातेल निर्यात ४ लाख टनानं कमी होऊन २१ लाख टनांवरच स्थिरावेल, असा अंदाज आहे.

Soybean Market
Soybean Seed : घरगुती बियाणे वापरणे का महत्त्वाचे आहे?

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात चढ उतार सुरु आहेत. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत सोयाबीनचे वायदे १५.१६ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडच्या वायद्यांनी ४६५ डाॅलर प्रतिटनांपर्यंत वाढले होते. आज सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये जवळपास १ टक्क्याने वाढ झाली होती.

देशातील बाजारात आजही जवळपास दोन लाख क्विंटलची आवक झाली होती. यापैकी महाराष्ट्रात ८० हजार टनांची आवक होती. आज सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ४५० रुपये दर मिळाला. तर प्रतिक्रिया प्लांट्सचे दर ५ हजार ४०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते.

मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दैनंदीन आवकेत वाढ झालेली दिसते. मात्र सोयाबीनचा शिल्लक साठा आता कमी आहे. पुढील काळात बाजारातील आवकही कमी होईल. त्यावेळी दरात सुधारणा दिसू शकते. मात्र बाजारातील फंडामेंटल्स बदलल्यानंतर दरात तात्पुरते चढ उतार येत असतात. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच विक्रीचा निर्णय घ्यावा, असं आवाहन सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी केलंय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com