Chana Market : हरभरा दर यंदा तरी वाढतील का?

देशातील रब्बी पेरणी आता जवळपास संपली. देशात ३ फेब्रुवारीपर्यंत रब्बीची जवळपास ७२० लाख हेक्टरवर पेरणी झाली.
Chana Market News
Chana Market NewsAgrowon

Pune Gram Crop News : मागीलवर्षी तोट्याचा ठरलेला हरभरा (Harbhara) आताही दबावात आहे. यंदा हरभरा पेरणी (Gram Sowing) घटली, त्यातच पिकाचं नुकसानही होत आहे. देशातील महत्वाच्या हरभरा उत्पादक राज्यांमध्ये यंदा पिकाला पाऊस (Rain) आणि बदलत्या वातावरणचा फटका बसला.

तर आता बाजारात नवा हरभरा दाखल झाला आहे. पण यंदाही हरभरा बाजार नाफेडच्या खरेदीवरच अवलंबून राहीलं, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील रब्बी पेरणी आता जवळपास संपली. देशात ३ फेब्रुवारीपर्यंत रब्बीची जवळपास ७२० लाख हेक्टरवर पेरणी झाली. तर कडधान्याचा पेरा काहीसा वाढून १६७ लाख  हेक्टरवर पोचला. कडधान्यामध्ये हरभऱ्याचा पेरा सर्वाधिक आहे.

मात्र यंदा गेल्यावर्षीपेक्षा हरभरा पेरा जवपास २ टक्क्यांनी घटला. देशात ११२ लाख हेक्टरवर यंदा शेतकऱ्यांना हरभरा पेरणी केली.

तर महाराष्ट्रात सर्वाधिक २९ लाख हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झाला. म्हणजेच देशातील एकूण पेरणीपैकी जवळपास २६ टक्के हरभरा क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे.

Chana Market News
Chana production : खानदेशात हरभरा उत्पादन कमी

यंदा हरभरा पेरा  घटला तरी नाफेडच्या गोदांममध्ये मागील हंगामातील हरभऱ्याचा साठा मोठ्या प्रमाणात आहे. नाफेडकडे १५ लाख टनांच्या दरम्यान हरभरा साठा असू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नाफेड मागील वर्षभर टप्प्याटप्प्याने हरभरा बाजारात आणत आहे. त्यामुळं हरभरा दरात मागील वर्षभरात एकदाही तेजी पाहायला मिळाली नाही. नाफेडच्या विक्रीचा हरभरा बाजारावर दबाव कायम राहू शकतो.

हरभरा पिकाला काही राज्यांमध्ये पाऊस आणि कडाक्याच्या थंडीचा फटका बसला. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांमध्ये हरभरा पिकाला पावसाचा तडाखा बसला.

तर अनेक भागांमध्ये तापमानात मोठी घट झाली होती. त्यामुळं हरभरा पिकाचं नुकसान झालं. या महाराष्ट्रातही काही भागांमध्ये हरभरा पिकाचं नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.

काय आहे सध्याची दरपातळी?

देशातील अनेक बाजारांमध्ये सध्या नव्या हरभऱ्याची आवक होत आहे. मात्र या हरभऱ्याला ४ हजार ६०० ते ४ हजार ९०० रुपये दर मिळत आहे.

नाफेडची विक्रीही दुसरीकडे सुरुच आहे. त्यामुळं हरभरा दरावर दबाव आहे. मात्र काबुली हरभऱ्याचे दर तेजीत आहेत. सध्या काबुली हरभऱ्याला ११ हजार ५०० ते १३ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे.

Chana Market News
Podcast TItle: हरभरा बाजारावर नाफेडचा प्रभाव दिसणार | Agrowon | ॲग्रोवन

काय राहू शकतं बाजाराचं चित्र?

यंदा देशातील देशी हरभरा उत्पादन घटण्याचा अंदाज असला तरी नाफेडकडे शिल्लक साठा जास्त आहे. नव्या हंगामात खरेदीसाठी गोदामे रिकामी करण्यासाठी नाफेड हरभऱ्याची विक्री वाढत आहे. याचा दबाव दरावर आहे. त्यामुळं यंदा नाफेड हरभरा खेरदी किती करते तसेच उत्पादन किती कमी राहते, यावरच हरभऱ्याचा बाजार अवलंबून आहे, असे हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com