Cotton Market : कापूस दर पुन्हा वाढतील का? भावातील नरमाई कायम

देशातील बाजारात आज कापूस दर स्थिर होते. कापसाच्या दरात मागील आठवड्यापासून काहीशी नरमाई आली.
Cotton Rate
Cotton RateAgrowon

Cotton Market Rate : कापूस दरात (Cotton Rate) सुधारणा होण्याची अपेक्षा असताना नरमाई दिसली होती. त्यामुळं शेतकरीही संभ्रमात पडले. बाजारातील कापूस आवकही (Cotton Arrival) वाढली. आज जवळपास दीड लाख गाठी कापसाची आवक झाली होती. तर कापूस दर आज स्थिर होते.

आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दरात चढ उतार सुरु आहेत. पण देशातील कापूस दर जास्त काळ दबावात राहणार नाहीत. कापूस दरात पुन्हा सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील बाजारात आज कापूस दर स्थिर होते. कापसाच्या दरात मागील आठवड्यापासून काहीशी नरमाई आली. पण आतापर्यंत मर्यादीत कापूस विक्री करणाऱ्यांनी नरमलेल्या दरात विक्री वाढवली. शेतातील सर्व कापूस आता जवळपास घरात आला.

त्यामुळं शेतकरी कापूस विकत असल्याचं दिसतं. तर बहुतेक शेतकरी आजही कापूस दरवाढीची वाट पाहत आहेत. त्यामुळंच सध्या बाजारातील कापूस आवक वाढली तरी उद्योगांना अपेक्षित पातळीवर पोचली नाही.

Cotton Rate
Cotton Market : केंद्रे तयार, खरेदीचा पत्ता नाही

फेब्रुवारीच्या मध्यानंतर बाजारातील कापूस आवक दैनंदिन २ लाख गाठींवर पोचेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत होते. पण तसं होताना दिसत नाही.

आज बाजारातील आवक दीड लाख गाठींच्या दरम्यान होती. राज्यनिहाय विचार करता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक कापूस विकला. त्यानंतर गुजरात आणि तेलंगणात आवक झाली.

Cotton Rate
Cotton Rate : पांढऱ्या सोन्याला मिळतोय कवडीमोल भाव

आजचा कापूस बाजार

आज देशात कापसाला सरासरी ७ हजार ९०० ते ८ हजार ३०० रुपये भाव मिळाला. कापसाची भावपातळी आजही काहिशी स्थिरावली होती. तर वायद्यांमध्ये सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुधारणा दिसली. एप्रिलचे वायदे १४० रुपयाने वाढून ६३ हजार ५२० रुपये प्रतिखंडीवर होते.

तर जूनचे वायदे २८० रुपयाने वाढून ६३ हजार ९२० रुपयांवर होते. वायद्यांमध्ये सुधारणा दिसल्यानं बाजारात काहिशी सकारात्मक स्थिती होती.

आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती

आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करता, आज वायद्यांमध्ये सुधारणा दिसली. तर प्रत्यक्ष खरेदीत दर काहिसे नरमले होते. वायदे सायंकाळपर्यंत ८६ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर काॅटलूक ए इंडेक्स ९८.६० सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होता.

दर कमी होण्याची चिंता नको

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात सध्या चढ उतार असले तरी मागणी वाढलेली आहे. चीनकडून कापूस खरेदी सुरु आहे. अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलियातून कापसाला चांगला उठाव मिळतोय. त्यामुळं कापूस दरातील नरमाई जास्त दिवस दिसणार नाही.

तसचं देशातही कापसाला चांगला उठाव आहे. सूत आणि कापूस निर्यात सुरु झाली. सध्या नरमलेल्या दरात कापसाला चांगली मागणी आहे. त्यामुळं दरात लवकरच सुधारणा दिसू शकते.

कापसाची सरासरी दरपातळी ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान पोहचू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com