Soybean Rate : पुढील आठवड्यात सोयाबीन वाढेल का?

देशातील बाजारात सोयाबीन दरवाढीची शक्यता निर्माण झाली.
Soybean Rate
Soybean Rate Agrowon

Soybean Price : चालू आठवड्यात देशातील बाजारात सोयाबीन दरात (Soybean Market) काहिशी सुधारणा पाहायला मिळाली. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन (Soybean Export) आणि सोयापेंड तेजीत (Soymeal Rate) राहिले. अर्जेंटीनातील वाढत्या दुष्काळामुळं सोयापेंडला चांगला उठाव मिळतोय.

त्यामुळं सोयाबीनलाही आधार मिळताना दिसत आहे. पुढील आठवड्यात सोयाबीन दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील बाजारात सोयाबीन दरवाढीची शक्यता निर्माण झाली. आज काही बाजारांमध्ये किमान दरात क्विंटलमागं १०० रुपयांची वाढ पाहायला मिळाली. चालू आठवड्यात सोयाबीन दरात क्विंटलमागं सरासरी १०० रुपयांची सुधारणा दिसली.

सोमवारी सोयाबीनला सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ४०० रुपये दर होता. आठवडाभर दरात चढ उतार राहिले. मात्र शनिवार बाजारात सरासरी दर ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. म्हणजेच दरात सरासरी १०० रुपये वाढ झाली.

Soybean Rate
Soybean Market: देशात खाद्यतेलाचा यंदा दुप्पट स्टाॅक | ॲग्रोवन

सोयाबीनचे वायदे कसे राहिले?

आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोयाबीन दरात काहीशी नरमाई दिसून आली. सोयाबीनचे वायदे १५.३३ डाॅलर प्रतिबेशुल्सवर सुरु झाले होते. रुपयात हा भाव ४ हजार ६४५ रुपये होतो. सोयाबीनच्या वाद्यांमध्ये आठवडाभर चढ उतार पाहयला मिळाले.

तर शुक्रवारी शेवटी वायदे १५.२९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले. म्हणजेच ४ हजार ६३३ रुपयांवर बाजार बंद झाला. याचाच अर्थ असा की वायद्यांमध्ये दरात नरमाई पाहायला मिळाली.

सोयापेंडचा बाजार सुधारला

सोयापेंड बाजाराचा विचार करता वाढ पाहायला मिळाली. सोमवारी सोयापेंडचे वायदे ४९३ डाॅलर प्रतिटनाने सुरु झाले होते. सोयापेंडच्या दरात जास्त नरमाई चालू आठवड्यात दिसली नाही. तर शुक्रवारी वायदे जवळपास ४९९ डाॅलरवर बंद झाले. म्हणजेच सोयापेंडच्या वायद्यांमध्ये आठवडाभरात ६ डाॅलरची सुधारणा पाहायला मिळाली.

Soybean Rate
Soybean Rate : सोयाबीन बाजार आज कसा राहिला? सर्वाधिक दर किती मिळाला?

पुढील आठवड्यात दर सुधारण्याचा अंदाज

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव तेजीत आहेत. त्यामुळं भारतीय सोयापेंडला मागणी वाढली. जगातील महत्वाच्या सोयापेंड निर्यातदार अर्जेंटीनात दुष्काळी स्थितीमुळं उत्पादन घटलं. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंड तेजीत आहे.

याचा फायदा भारताला मिळतोय. भारतातून सोयापेंड निर्यातीचे सौदे मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळं सोयाबीनची खरेदी वाढू शकते. परिणामी पुढील आठवड्यात सोयाबीन दरात २०० रुपयांपर्यंत सुधारणा दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com