Chana Market : हरभऱ्याचे भाव यंदा तेजीत राहणार का?

शेतीमाल बाजारात सध्या हरभरा तेजीत असल्याची चर्चा आहे. त्यातच हरभरा लागवड गेल्यावर्षीपेक्षा कमी झाली. त्यामुळं २०२३ मध्ये हरभऱ्याला चांगला दर मिळू शकतो, असा अंदाजही व्यक्त केला जातोय.
Chana Market
Chana MarketAgrowon

अनिल जाधव
पुणेः शेतीमाल बाजारात सध्या हरभरा तेजीत असल्याची चर्चा आहे. त्यातच हरभरा लागवड (Chana Sowing) गेल्यावर्षीपेक्षा कमी झाली. त्यामुळं २०२३ मध्ये हरभऱ्याला चांगला दर (Chana Rate) मिळू शकतो, असा अंदाजही व्यक्त केला जातोय.

बरं ही चर्चा आता चांगलीच जोर धरु लागली. पण यंदा देशातील हरभरा उत्पादन (Chana Production) किती होईल? हे आत्ताच सांगता येत नाही. मात्र गेल्यावर्षीप्रमाणे हरभऱ्याला कमी दर मिळण्याची शक्यता कमीच आहे, असे हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले. 

Chana Market
Chana Market : देशी हरभऱ्याचे दर वाढतील का?

हरभरा बाजारात मागील दोन महिन्यांपासून गुणवत्तापूर्ण मालाची टंचाई आहे. देशातील दिल्ली, मुंबई, कोलकाता, पुणे आदी मोठ्या बाजारपेठांमध्ये टंचाई होती.

त्यामुळं दरही वाढले. सध्या या बाजारांमध्ये हरभऱ्याला सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ३०० रुपये दर मिळतोय. तसंच हा दर टिकून राहील, असंही सांगितलं जातं.

Chana Market
Chana Market : हरभऱ्याचा पेरा यंदा खरंच कमीच राहणार का?

मागील हंगामात हरभरा तोट्याचा ठरला. त्यामुळं यंदा शेतकरी हरभरा लागवड कमी करतील, असा अंदाज होता. पण अगदी मागील आठवड्यापर्यंत पेरा काहीसा जास्त दिसत होता. मात्र आज, म्हणजेच ६ जानेवारीपर्यंत हरभरा पेरणी गेल्यावर्षीपेक्षा १.२४ टक्क्यांनी घटली.

मागीलवर्षी ६ जानेवारीपर्यंत १०९ लाख हेक्टरवर हरभरा होता. तर यंदा जवळपास १०८ लाख हेक्टरवर लागवड झाली. मात्र पेरणीचा अंतिम आकडा येईपर्यंत लागवडीतील ही घट आणखी वाढू शकते, असाही अंदाज आहे.

त्याच हरभरा पिकाचं नुसकानही होतंय. यंदा पिकाला पोषक थंडी पडली नाही. डिसेंबरमध्ये पडणारी थंडी हरभरा पिकाला पोषक असते.

तसंच मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात अनेक भागात मर रोग आणि घाटे अळीचाही प्रादुर्भाव झाला. किमान तापमान वाढल्याचाही फटका पिकाला बसतोय. त्यामुळं उत्पादन घटण्याचा अंदाज आहे.   


काय आहे स्थिती?

- देशात सध्या गुणवत्तापूर्ण हरभरा कमी
- उत्पादनही घटण्याचा अंदाज

- १०० लाख टन ते १२० लाख टनांचे अंदाज
- हरभरा पीक सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत
- पुढील महिनाभरातील नुकसानही पाहणं गरजेचं


काय स्थिती राहू शकते?

सध्या हरभरा दरात असलेली तेजी बाजारातील कमी आवक आणि गुणवत्तापूर्ण मालाचा तुटवडा असल्यानं आहे. हा भाव शेतकऱ्यांना मिळत नाही. पण पुढील महिनाभरात हरभरा उत्पादनाचं चित्र स्पष्ट होऊ शकतं.

त्यावेळी उत्पादन आणि नाफेडकडील साठा विचारात घेऊन दराविषयी भाष्य करता येईल. पण सध्याची परिस्थिती पाहता हरभऱ्याची किमान गेल्या वर्षीप्रमाणं वाताहत तरी होणार नाही, एवढं मात्र सांगता येऊ शकतं.

त्यामुळं शेतकऱ्यांनी देशातील हरभरा नुकसान, उत्पादन, नाफेडचा साठा आणि उत्पादनाचे अंदाज याकडं बारकाईनं लक्ष ठेवावं. हरभरा करण्याआधी बाजारातील दराची चचपणी करावी, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे.

सध्या दिल्लीसह महत्वाच्या बाजारांमध्ये हरभऱ्याला चांगला दर मिळत आहे. त्यातच यंदा हरभरा उत्पादन कमी राहण्याचाही अंदाज आहे.त्यामुळे हरभऱ्याचे दर चांगले राहू शकतात.
- राहूल चौहान, संचालक, आयग्रेन इंडिया, नवी दिल्ली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com