चालू आर्थिक वर्षात भारताची गहू निर्यात ७० लाख टनांवर: एफएओ

रशिया युक्रेन युद्धामुळे अनेक देशांनी आपल्या व्यापारी धोरणात बदल केले.त्यामुळे आंतराराष्ट्रीय बाजारातील गव्हाची उपलब्धता कमी झाली, परिणामी गव्हाचे दर वाढले.
Wheat
Wheat Agrowon

निर्यातबंदीचा अपवाद वगळता २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात भारताची गहू निर्यात ७० लाख टनांवर जाईल, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशनने (FAO) व्यक्त केला आहे. गेल्या पाच वर्षातील भारताची ही सर्वोच्च गहू निर्यात ठरेल.

निर्यातबंदीपूर्वी केलेले निर्यातीचे करार, सरकारी पातळीवरील निर्यात आणि ज्या देशांची खाद्य सुरक्षा धोक्यात आली आहे अशा देशांना निर्यातीच्या शक्यता यामुळे भारताची गहू निर्यात ७० लाख तणांवर जाण्याचा कयास व्यक्त केला आहे.

फूड अँड ॲग्रीकल्चरने (FAO) गुरुवारी (तारीख ९ जून) आपला खाद्य अहवाल प्रकाशित केला. ज्यात जागतिक गहू बाजारातील अनिश्चिततेचा उल्लेख केला आहे.

रशिया युक्रेन युद्धामुळे अनेक देशांनी आपल्या व्यापारी धोरणात बदल केले.त्यामुळे आंतराराष्ट्रीय बाजारातील गव्हाची उपलब्धता कमी झाली, परिणामी गव्हाचे दर वाढले. २००८ नंतर प्रथमच जागतिक बाजारातील गव्हाचे दर एवढे वाढले असल्याचे या अहवालात म्हटले आहे. जगातील प्रमुख गहू उत्पादक देशांतील गव्हाच्या उत्पादनात घट झाली.

अनेक देशांनी निर्यातबंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे पुरवठा साखळी खंड झाली. गव्हाचा मोठा निर्यातदार असलेल्या युक्रेनमधील उत्पादनातही घट झाली तर भारतासारख्या संभाव्य निर्यातदार देशातील गव्हाचे उत्पादनही घटल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

२०२१ च्या जागतिक गहू उत्पादनाच्या तुलनेत २०२२ ला ०.८ टक्क्यांची घट होणार असून प्रत्यक्षातील गहू उत्पादन ७७१ दशलक्ष टन होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मागील चार वर्षातील ही पहिलीच घट आहे.

युद्धामुळे २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात युक्रेनमधून होणाऱ्या गहू निर्यातीत गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास ५० टक्क्यांची घट होईल. युक्रेनमधून होणारा पुरवठा खंडित झाल्याने अनेक देशांनी भारताकडून गहू खरेदी केला. गेल्या महिन्यातील निर्यातबंदीचा अपवाद वगळता भारताने २०२१ च्या तुलनेत जागतिक बाजारातील आपली निर्यात वाढवली असून इजिप्त, व्हिएतनामसारख्या देशांनी भारताकडून गहू खरेदी केला असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.

निर्यातबंदीचा अपवाद वगळता २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात भारताकडून ७० लाख टन गहू निर्यात केला जाईल, असे भाकीत अहवालात वर्तवण्यात आले. याखेरीज यावर्षी भारताचे गहू उत्पादन १०५.५ दशलक्ष टन असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. २०२१ च्या गहू उत्पादनाच्या तुलनेत हे ४ टक्के कमी ठरले आहे.

अनुकूल हवामान आणि सरकारकडून देण्यात येणाऱ्या हमीभावामुळे यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रात गहू लागवड करण्यात आली. मात्र मार्च आणि एप्रिल महिन्यातील उष्णतेच्या लाटेमुळे देशातील गहू उत्पादनात अपेक्षेपेक्षा अधिक घट झाली.

गव्हाची दरवाढ आणि देशांतर्गत उत्पादनातील घटीच्या पार्श्वभूमीवर मागच्या महिन्यात भारताने गहू निर्यातबंदीचा निर्णय घेतला. निर्यातदारांना सरकारच्या पूर्वसंमतीनेच निर्यात करता येईल, अशी अट टाकण्यात आली. याखेरीज खाद्य सुरक्षा धोक्यात आलेल्या देशांच्या विनंतीनुसार निर्यात करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

देशांतर्गत गरज आणि शेजारील देशांच्या खाद्य सुरक्षेला प्राधान्य देत भारताने मे महिन्यात आपल्या निर्यात धोरणात बदल केल्याचे भारताचे परराष्ट्र मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सांगितले. निर्यातबंदीचा निर्णय घेतला असला तरी भारत खाद्य संकटास तोंड देणाऱ्या देशांची मागणी पूर्ण करणार असल्याचेही मुरलीधरन म्हणाले आहेत. त्यासाठी संबंधित देशाच्या सरकारकडून तशी मागणी करण्यात यायला हवी, असे स्पष्ट केले आहे.

२०२१-२०२२ मध्ये सलग दुसऱ्या हंगामात भारताचे एकूण साखर उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. भारत सलग दुसऱ्या वर्षी दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार ठरेल. २०२१-२०२२ च्या हंगामात भारताची साखर निर्यात ९ दशलक्ष टन राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

२०२०-२०२१ च्या तुलनेत या हंगामात भारताकडून विक्रमी ३५ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन घेतले जाईल, असा अंदाजह व्यक्त करण्यात आला आहे. उसाचे दर्जेदार वाण, खतांचा योग्य वापर आणि अनुकूल हवामानामुळेचे हे शक्य झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. भारताचे दूध उत्पादन यावर्षी २१७ दशलक्ष तणांवर जाईल, असा अंदाज फूड अँड ॲग्रीकल्चरने (FAO) आपल्या अहवालात व्यक्त केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com