MSP Procurement : दिल्लीत २०१६ नंतर एफसीआयकडून खरेदीच नाही

दिल्लीतील शेतकऱ्यांसाठी रब्बीचा हंगाम (Rabbi Season) हा महत्त्वपूर्ण मानला जातो. रब्बीत प्रामुख्याने गव्हाचे (Wheat) पीक घेतले जाते. याच हंगामातील उत्पादनावर शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते.
Wheat Procurement
Wheat ProcurementAgrowon

भारतीय अन्न महामंडळाने (FCI- एफसीआय) २०१६-२०१७ या आर्थिक वर्षांपासून दिल्लीतील रब्बी पिकांची हमीभावाने (MSP) खरेदीच केलेली नाही. दिल्ली सरकारच्या नियोजन विभागातर्फे केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली. दिल्लीतील रब्बी पिकांच्या हमीभावाने खरेदीचे सर्वसाधारण प्रमाण तसे कमीच होते, मात्र २०१६-२०१७ पासून ही खरेदी पूर्णतः थांबवल्याचे या अभ्यासात समोर आले.

दिल्लीतील शेतकऱ्यांसाठी रब्बीचा हंगाम हा महत्त्वपूर्ण मानला जातो. रब्बीत प्रामुख्याने गव्हाचे (Wheat) पीक घेतले जाते. याच हंगामातील उत्पादनावर शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते. दिल्लीत २०,१९० एकर जमिनीवर शेती केली जाते. यातील ३८ टक्के शेतजमीन दक्षिण पूर्व दिल्लीत तर ३१ टक्के शेतजमीन उत्तर दिल्लीत आहेत. उर्वरित शेतजमीन राजधानीच्या इतर भागात आहेत. दिल्लीत सरासरी जमीनधारणा ४.१ एकर आणि २.९ एकर आहे.

Wheat Procurement
Compensation : झारखंडमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत

दिल्लीतील शेतकरी प्राधान्याने गव्हाचे पीक घेतात. गहू लागवडीचे प्रमाण ६७ टक्के असून गव्हानंतर शेतकरी भात लागवडीस (Paddy Cultivation) प्राधान्य देतात. दिल्लीत गव्हाचे सरासरी ८३ हजार टन उत्पादन होते तर १० हजार टन तांदूळ पिकवला जात असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले.

भारतीय अन्न महामंडळाच्या विभागीय कार्यालयाकडील माहितीनुसार, २०११-२०१२ या आर्थिक वर्षात भारतीय अन्न महामंडळाने (FCI) नरेला बाजार समितीतून ४७६३ टन गहू (Wheat) खरेदी केले होते. २०१२-२०१३ या आर्थिक वर्षात १३,५२४ टन गव्हाची खरेदी केली होती. २०१२-२०१३ ला नजफगड बाजारातून १७०७१ टन गहू हमीभावाने खरेदी केले होते.

Wheat Procurement
MSP panel: हमीभाव समितीत पंजाबला स्थान देण्याची मागणी

नरेला आणि मायापुरी येथील धान्य साठवणूक यंत्रणेकडून खरेदीने करण्यात आली नाही. २०१३-२०१४ मध्ये नजफगड बाजारात केवळ १८ टन गव्हाची खरेदी करण्यात आली. २०१५-२०१६ मध्ये नजफगड बाजारात १६७१ टन गहू खरेदी करण्यात आला तर नरेला बाजारात केवळ ११६ टन गहू हमीभावाने खरेदी करण्यात आला होता. त्यानंतर २०१६ ते २०२० या काळात भारतीय अन्न महामंडळाने धान्याची खरेदी केलेले नाही.

भारतीय अन्न महामंडळाकडून (FCI) शेतमालाची हमीभावाने होणारी खरेदी हा शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नाचा महत्वपूर्ण आधार समजला जातो. खुल्या बाजारातील भाव पडलेले असताना हमीभावाने खरेदीची प्रक्रिया हे त्यांच्यासाठी निर्णायक बाब असते. या पार्श्वभूमीवर भारतीय अन्न महामंडळाकडून हमीभावाने (MSP) खरेदीची प्रक्रियाच न होणे ही शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब असल्याचे या अभ्यासात नोंदवण्यात आले.

Wheat Procurement
Wheat Export Ban :निर्यातबंदीचा फटका शेतकऱ्यांना नाही: तोमर

शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल, भाजीपाला,फळे, फुले खरेदी करण्यासाठी दिल्लीत ८ मोठ्या कृषी उत्पादन बाजार समित्या (APMC) आहेत. त्यातील नजफगड आणि नरेला या बाजार समित्या प्रसिद्ध असून शेतकरी आपला माल विक्रीसाठी या दोन बाजार समित्यांत आणत असतात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com