
Tur Chana Market अकोला : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत (Akola APMC) मोजमाप, लिलावापेक्षा आवक मोठी असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात शेतीमाल पडून राहत आहे. पुढील तीन-चार दिवसांत पावसाचा इशारा देण्यात आल्याने आता बाजारात सुविधा पाहूनच आवक ()hana Arrival) मागवण्याची सूचना अडते, खरेदीदारांना करण्यात आली आहे.
बाजार समितीच्या यार्डात हरभरा, तूर, सोयाबीनची (Soybean) पोती सर्वदूर पडलेली पाहायला मिळत आहेत. त्यातच आता रविवारी व मंगळवारी (ता. ७) धूलिवंदनची सुटी असल्याने बाजार समितीत नव्या मालाची खरेदी-विक्री बुधवारपासून (ता. ८) होऊ शकेल, अशी शक्यता आता वर्तविली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून या बाजार समितीत सोयाबीन, तूर आणि हरभऱ्याने बाजार फुललेला आहे. हरभऱ्याची शुक्रवारी (ता. ३) सुमारे पाच हजार क्विंटलची आवक झाली होती. बाजारात सोयाबीनचीही तीन हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली. तुरीची सुद्धा दीड हजार क्विंटलवर आवक होती.
दररोज आवक मोठी झाल्याने लिलाव तसेच मोजमाप पूर्ण होत नाही. यामुळे नवीन आवक आता जागा पाहून करण्याचे तोंडी आदेश बाजार समितीने अडते, खरेदीदारांना दिले आहेत. पावसाचा अंदाज आल्याने खबरदारी म्हणून या काळात माल उघड्यावर राहणार नाही यासाठी शेतकऱ्यांनीही परिस्थिती लक्षात घेऊनच आवक करावी, असे सांगण्यात आले आहे.
पावसाबाबत दक्षतेचा इशारा
प्रादेशिक मोसम विभाग नागपूर यांच्याकडून आलेल्या संदेशानुसार जिल्ह्यात रविवार (ता. ५) ते मंगळवार (ता. ७) दरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी आपला माल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा.
तसेच बाजार समितीमध्ये शेतीमाल विक्रीकरिता आणला असल्यास मालाचे नुकसान होणार नाही याबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.