Soybean Rate : अमेरिकेतील सोयाबीन दर टिकणार का?

अमेरिकेच्या सोयाबीनला मागणी कशी राहीली?
Soybean
Soybean Agrowon

पुणेः अमेरिका आणि भारताचा सोयाबीन (Soybean) हंगाम जवळपास एकाचवेळी सुरु होतो. सध्या अमेरिकेतील सोयाबीन काढणी (Soybean Harvest) वेग घेतेय. यंदा अमेरिकेत काही ठिकाणी दुष्काळ तर काही ठिकाणी अतिपावसाचा फटका पिकाला बसला. त्यामुळं उद्योग आणि निर्यातदार उत्पादकतेचा अंदाज घेत आहेत.

अमेरिकेत सध्या सोयाबीनच्या काढीला वेग आलाय. मात्र अमेरिकेतील सोयाबीन (America Soybean) उत्पादक पट्ट्याला काही ठिकाणी कमी पाऊस तर कुठं दुष्काळाचा फटका (Drought Heat) बसला. त्यामुळं निश्चित उत्पादकता किती येईल याचा अंदाज प्रक्रियादार आणि निर्यातदार घेत आहेत. सोयाबीन प्रक्रिया (Soybean Process) उद्योग सध्या सोयाबीन उत्पादकता किती येईल याचा जवळून अंदाज घेत आहे. त्यामुळं त्यांच्याकडून खरेदीही सावधगिरीने सुरु आहे. त्यातच काही भागांमध्ये यंदा उत्पादकता (Soybean Productivity) घटल्याचं स्पष्ट झालं. पुढील महिनाभरात सर्व चित्र स्पष्ट होईल. मात्र या परिस्थितीतही सोयाबीनचा बाजार काहीसा स्थिर आहे.

Soybean
Cotton Rate : पाकिस्तान, बांगलादेशकडून कापूस आयात वाढणार

मागणीचा विचार करता यंदा अमेरिकेची सोयाबीन विक्री (Soybean Sell) कमी आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनचे वायदे मोठ्या प्रमाणात केले होते. मात्र सोयाबीन विक्रीला चांगला प्रतिसाद मिळतोय. चीन हा अमेरिकेच्या सोयाबीनचा सर्वात मोठा ग्राहक आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून चीन स्वस्त सोयाबीन मिळविण्यासाठी इतर देशांकडून खरेदी करतोय. चीनमधील प्रक्रिया उद्योगाचं मार्जिन एप्रिल महिन्यापासून उणे झालं होतं. त्यामुळं अनेक उद्योगांनी सोयाबीन गाळप (Soybean Crushing) बंद केलं होतं. पण सध्या चीनमधील बरहपालन व्यवसायातून सोयापेंडला मागणी वाढतेय. त्यामुळं चीनमधील प्रक्रिया उद्योगही सोयाबीन गाळप वाढविण्याची शक्यता आहे.

अमेरिकेची निर्यात करार सध्या गेल्यावर्षीच्या पातळीवर पोचली नाही. बाजारात सोयाबीन दरात काहीसे चढ-उतार सुरु आहेत. त्यामुळं अमेरिकेतून सोयाबीन खरेदी करणाऱ्या संस्था बाजार नरमण्याची वाट पाहत आहेत. पण सोयाबीन दर मागील काही दिवसांपासून शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडवर टिकून आहेत. सोयाबीनचे वायदे १३ ते १४ डाॅलर प्रतिबुशेल्सच्या दरम्यान टिकून आहेत. आज सोयाबीनचे नोव्हेंबरचे वायदे १३.८० डाॅलरने झाले. त्यामुळं अमेरिकेचं सोयाबीनही स्वस्त मिळण्याची शक्यता कमीच आहे.

Soybean
Soybean Harvesting : सोयाबीन ची काढणी करताना या गोष्टी लक्षात घ्या

त्यातच चीन आणि इतर देशांची मागणी वाढल्यास अमेरिकेच्या सोयाबीन आणखी आधार मिळेल. त्यामुळं सोयाबीनचा आंतरराष्ट्रीय बाजार टिकून राहील. या परिस्थितीत देशातील सोयाबीन दरही मजबूत स्थितीत राहतील. सध्या सोयाबीन बाजारात चढ-उतार सुरु आहेत. सध्या सोयाबीनला ओलावा आणि गुणवत्तेप्रमाणं ४ हजार ६०० ते ५ हजार १०० रुपयांदरम्यान दर मिळतोय. यंदा हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनला सरासरी किमान ५ हजार रुपये दर मिळेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com