Grape Export : सांगलीतून परदेशातील द्राक्ष निर्यातीत १४७६ टनांनी वाढ

यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे काही शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला होता. परिणामी छाटणी लांबणीवर पडली होती. त्यातूनही बागा साधल्या.
Grape Export : सांगलीतून परदेशातील द्राक्ष निर्यातीत १४७६ टनांनी वाढ

Grape Market Update जिल्ह्यातून यंदाच्या हंगामात युरोपसह अन्य देशात १ हजार २५१ कंटेनर म्हणजे १७ हजार ८३४ टन द्राक्षनिर्यात (Grape Export) झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत चालु हंगामात १ हजार ४७६ टनांनी निर्यात वाढली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या (Agriculture Department) सूत्रांनी दिली.

जिल्ह्याचे द्राक्षाचे क्षेत्र १ लाख ३० हजार एकरांवर आहे. सांगलीतून दरवर्षी द्राक्ष निर्यात करण्यासाठी शेतकरी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे द्राक्ष निर्यातीचा आलेख वाढू लागला आहे. यंदाच्या हंगामात द्राक्ष निर्यातीसाठी ९ हजार ५१६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ५ हजार ३०९ हेक्टरवरील द्राक्षे सातासमुद्रापार पोहोचली आहेत.

Grape Export : सांगलीतून परदेशातील द्राक्ष निर्यातीत १४७६ टनांनी वाढ
Grape Industry : ‘रेसिड्यू फ्री’ द्राक्षातील मोलाचं संशोधन

यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे काही शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला होता. परिणामी छाटणी लांबणीवर पडली होती. त्यातूनही बागा साधल्या. वास्तविक, नंतरच्या टप्प्यात वातावरण बदलाचा परिणाम द्राक्ष बागेला बसला.

परंतु परतीचा पाऊस, अतिवृष्टी झाली नाही. त्यामुळे द्राक्ष बागेचे नुकसान झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा बागेचा अतिरिक्त खर्च वाचला. यंदा प्रतिकूल परिस्थितीतही द्राक्ष निर्यात वाढल्याचे समोर आले आहे.

Grape Export : सांगलीतून परदेशातील द्राक्ष निर्यातीत १४७६ टनांनी वाढ
Grape Disease Management : अवकाळीनंतर द्राक्ष बागेतील रोग व्यवस्थापन कसे करावे?

गेल्या वर्षीच्या तुलनेत वातावरण चांगले राहिल्याने अडथळे आले नाहीत. त्यामुळे निर्यात वाढली. सुरुवातीला दर चांगले मिळाले.

२०२१ च्या हंगामात जिल्ह्यातून विक्रमी द्राक्षनिर्यात झाली होती. त्यानंतर निर्यातीत घट झाली होती. परंतु कृषी विभागाने सातत्याने द्राक्ष निर्यात वाढीसाठी प्रयत्न केल्याने यंदा द्राक्ष निर्यातदार शेतकऱ्यांची संख्याही वाढली.

आत्तापर्यंत जिल्ह्यातून १७ हजार ८३४ टन इतकी निर्यात झाली आहे. येत्या आठवड्यात जिल्ह्यातून द्राक्षाची एकूण किती निर्यात झाली, याची अंतिम आकडेवारी स्पष्ट होईल.

सांगली जिल्ह्यातील द्राक्षनिर्यात स्थिती

देश...कंटेनर...टन

युरोपियन देश...७४०...९९२५

अन्य देश...५११...७९०९

एकूण...१२५१...१७८३४

गतवर्षीपेक्षा यंदाच्या हंगामात १ हजार टनांनी द्राक्षनिर्यात वाढली आहे. येत्या आठवड्यात जिल्ह्यातून द्राक्षाची किती निर्यात झाली आहे, याची अंतिम आकडेवारी स्पष्ट होईल.
- प्रकाश नागरगोजे, कृषी अधिकारी (निर्यात), सांगली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com