Ethanol Production : राज्यातून आणखी ३० कोटी लिटरचा इथेनॉल पुरवठा शक्य

केंद्राकडून इथेनॉल उत्पादन वर्षाचा कालावधी एक डिसेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२२ असा गृहीत धरला जातो. त्यासाठी राज्यातील इथेनॉल प्रकल्पांना एकूण ११८ कोटी लिटर इथेनॉल पुरविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Ethanol Production
Ethanol ProductionAgrowon

पुणे ः राज्यात आतापर्यंत ८८ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन (Ethanol Production) झाले आहे. पुढील दोन महिन्यांत आणखी ३० कोटी लिटरचे उत्पादन होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

केंद्राकडून इथेनॉल उत्पादन वर्षाचा कालावधी एक डिसेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२२ असा गृहीत धरला जातो. त्यासाठी राज्यातील इथेनॉल प्रकल्पांना (Ethanol Project) एकूण ११८ कोटी लिटर इथेनॉल पुरविण्यास (Ethanol Supply) मान्यता देण्यात आली आहे. यापैकी ८८ कोटी लिटरचा पुरवठा तेल विपणन कंपन्यांना करण्यात आला आहे.

Ethanol Production
Ethanol Rate : यंदाही इथेनॉलच्या दरात वाढ होण्याची शक्यता

राज्यातील ३४ ते ३५ सहकारी साखर कारखाने सध्या इथेनॉल निर्मितीत उतरले आहेत. ३० पेक्षा अधिक खासगी कारखान्यांनी देखील इथेनॉल निर्मितीत आघाडी घेतली आहे. याशिवाय १५ उद्योगांनी स्वतःचे एकल (स्टॅन्डअलोन) तर धान्याधारित इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारले आहेत. त्यामुळे सध्या राज्याची एकूण इथेनॉल निर्मितीची स्थापित क्षमता वार्षिक २२५ कोटी लिटरवर गेली आहे.

Ethanol Production
Ethanol Production : ब्राझील इथेनॉलकडून साखरेकडे वळण्याची शक्यता

‘‘इथेनॉलमुळे राज्यातील साखर कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत व पुरेशी एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) देण्यासाठी हातभार लावला आहे. कारण आतापर्यंत पाच हजार कोटी रुपयांच्या आसपास रक्कम इथेनॉलमधून साखर कारखान्यांना मिळाली आहे. सध्या कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू नाही.

त्यामुळे इथेनॉल उत्पादन मंदावले आहे. मात्र १५ ऑक्टोबरपासून हंगाम सुरू होताच ३० नोव्हेंबरपर्यंत २५ ते ३० कोटी लिटर इथेनॉल तयार होईल. त्यामुळे केंद्राने राज्याला दिलेले पुरवठ्याचे उद्दिष्टदेखील पूर्ण होण्याची अपेक्षा आम्हाला आहे,’’ असे साखर उद्योगातील सूत्रांनी स्पष्ट केले.

दरम्यान, साखर कारखान्यांसाठी इथेनॉलचे दर वाढवून देण्यास केंद्रात अनुकूल वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. सध्या कारखान्यांना बी हेवी इथेनॉलसाठी प्रतिलिटर ५९.०८ रुपये, सी हेवीसाठी ४६.६६ रुपये तर ६३.४५ रुपये दर साखरेचा रस व पाकापासून तयार केलेल्या इथेनॉलकरिता दिला जातो आहे. यात दरांमध्ये एक ते दीड रुपया प्रतिलिटरपर्यंत वाढ झाल्यास कारखान्यांना दिलासा मिळू शकतो, अशी माहिती इथेनॉल उद्योग सूत्रांनी दिली.

राज्यातील इथेनॉल प्रकल्पांनी साखर उद्योगातील अर्थकारणाला मोठा हातभार लावला आहे. या प्रकल्पांमुळेच १२ लाख टन साखर इथेनॉलकडे वळवता आली. त्यामुळे साखर साठे अनावश्यकपणे वाढले नाहीत व कारखान्यांकडे अतिरिक्त पैसा आल्याने शेतकऱ्यांना एफआरपी वेळेत देता आली.
शेखर गायकवाड, साखर आयुक्त

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com