Silk Market : रेशीम बाजारपेठेत ७१२ टन कोषांची आवक

मराठवाड्यात वाढता रेशीम उद्योग पाहता कोष खरेदीसाठी बाजारपेठेची मागणी पुढे आली. त्यामधूनच २१ एप्रिल २०१८ ला जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रेशीम कोष खरेदीची राज्यातील पहिली प्रायोगिक तत्त्वावरील बाजारपेठ सुरू करण्यात आली.
Silk Market
Silk MarketAgrowon

Silk Market Update जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात पाच वर्षांपासून सुरू असलेल्या प्रायोगिक तत्त्वावरील रेशीम कोष बाजारपेठेत (Silk Cocoon Market) १ एप्रिल २०२२ ते २४ फेब्रुवारी २०२३ दरम्यान ७१२ टन रेशीम कोषाची आवक (Silk Cocoon Arrival) झाली.

तर या कोषांना सरासरी ५२५ रुपये प्रति किलोचा दर मिळाल्याची माहिती कोष खरेदीची जबाबदारी संभाळणारे भरत जायभाये यांनी दिली.

मराठवाड्यात वाढता रेशीम उद्योग पाहता कोष खरेदीसाठी बाजारपेठेची मागणी पुढे आली.

त्यामधूनच २१ एप्रिल २०१८ ला जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रेशीम कोष खरेदीची राज्यातील पहिली प्रायोगिक तत्त्वावरील बाजारपेठ सुरू करण्यात आली.

जवळपास पाच वर्षांपासून या बाजारपेठेतील उलाढाल सातत्याने वाढती राहिली आहे. गतवर्षी या बाजारपेठेत ४६२ रेशीम कोषांची खरेदी करण्यात आली होती.

Silk Market
Silk Cocoons : जालना बाजारपेठेत रेशीम कोष खातोय भाव

यंदा खरेदी केलेल्या रेशीम कोषांचा आकडा १ एप्रिल ते २४ फेब्रुवारी या कालावधीत ७१२ टनांवर गेला आहे. खरेदी केलेल्या या कोषांना किमान १९० तर कमाल ७५० रुपये प्रति किलोपर्यंतचा दर मिळाला.१ ते २४ फेब्रुवारी २०२३ या २४ दिवसांत ५७ टन रेशीम कोषांची खरेदी झाली. २० ते २४ फेब्रुवारी या चार दिवसांत जवळपास २५ टन रेशीम कोष खरेदी केले गेले.

२४ फेब्रुवारीला जवळपास ६ टन रेशीम कोषांची आवक मराठवाड्यासह लगतच्या नगर, जळगाव व बुलडाणा जिल्ह्यातून झाली. शुक्रवारी आवक झालेल्या रेशीम कोषांना १९० ते ६० रुपये प्रति किलो दरम्यान दर मिळाला.

Silk Market
Silk Cocoon Production : सांगलीत रेशीम कोष उत्पादनात होतेय वाढ

या रेशीम कोश खरेदीसाठी पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, कर्नाटक यांच्यासह जालना व राज्यातील इतर भागांतील जवळपास १३ ते १४ व्यापारी जालन्यात ठाण मांडून असतात. खरेदी केलेल्या कोषांची रक्कम तत्परतेने मिळणे हे एकमेव कारण जालना रेशीम कोष खरेदी बाजारपेठेच्या सातत्यपूर्ण व्यवहारामागे असल्याचे उत्पादक व व्यापाऱ्यांनी सांगितले.

नवीन इमारतीत स्थलांतरित होण्याची प्रतीक्षा

जालना शहरालगतच्या एका जागेत रेशीम कोष खरेदीची अद्ययावत सुविधा असलेली इमारत उभी राहिली आहे. या इमारतीचे लोकार्पण होणे बाकी आहे. इमारतीचे काम पूर्ण होऊन, लोकार्पण केव्हा होणार, असा प्रश्‍न रेशीम कोष उत्पादकांना पडला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com