Nagar Vegetable Market : नगरला गाजर, वाटाणा, हिरवी मिरचीची आवक वाढली

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यात हिरवी मिरची, गाजर, वाटाण्याची आवक वाढली होती.
Green Chilies Rate
Green Chilies RateAgrowon

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत (Nagar APMC) मागील आठवड्यात हिरवी मिरची (Green Chili Arrival, गाजर, वाटाण्याची आवक (Matar Arrival) वाढली होती. भाजीपाला व पालेभाज्यांच्या दरात (Vegetable Rate) चढउतार कायम होता. फळांची आवक जेमतेम होती, असे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

Green Chilies Rate
Matar Harvesting : वाटाणा तोडणीसाठी शेतकऱ्यांची घाई

नगर येथील बाजार समितीत मागील आठवड्यात दररोज २०० क्विंटलपर्यंत वाटाण्याची आवक होऊन १ हजार ते तीन हजार रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळाला.

हिरव्या मिरचीची १०५ क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ते पाच हजार, मकरसंक्रांतीच्या पार्श्‍वभूमीवर गाजराची १७० क्विंटलपर्यंत आवक होऊन दीड हजार ते अडीच हजारांचा दर मिळाला. टोमॅटोची १६५ क्विंटलपर्यंत आवक होऊन २०० चे १ हजार, वांगीची ४९ क्विंटलपर्यंत आवक होऊन दर १ हजार ते सहा हजार होते.

Green Chilies Rate
Chilli Market : देशातील लाल मिरचीचे उत्पादन यंदा घटले?

फ्लॉवरची ७२ क्विटंलपर्यंत आवक होऊन ५०० ते अडीच हजार, काकडीची ५१ क्विंटलची आवक होऊन ५०० ते २ हजार, गवारची ७ क्विंटलपर्यंत आवक होऊन ५ हजार ते १५ हजार, घोसाळ्याची ५ क्विटंलपर्यंत आवक होऊन १ हजार ते २ हजार, दोडक्याची ७ क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ते ५ हजार ५००, कारल्याची २५ क्विटंलपर्यंत आवक होऊन १ हजार ते ३ हजार, भेंडीची १७ क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ते ६ हजार दर राहिला.

तर वाल शेंगाची १३ क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ते ६ हजार, घेवड्याची ७ क्विंटलपर्यंत आवक होऊन १ हजार ते अडीच हजार, बटाट्याची ३५० क्विंटलपर्यंत आवक होऊन ७०० ते २१००, शेवग्याची ५ क्विंटलपर्यंत आवक होऊन ४ हजार ते नऊ हजार, लिंबाची १७ क्विंटलपर्यंत आवक होऊन १ हजार ते आडीच हजार, शिमला मिरचीची १९ क्विंटलपर्यंत आवक होऊन १५०० ते ३५०० रुपयांचा दर मिळाला.

मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू, करडी भाजी, शेपीची आवक व दर स्थिर होते. संक्रांतीच्या पार्श्‍वभूमीवर कांदा पातीची दररोज पाच ते सात क्विंटलपर्यंत आवक होत होती.

पेरू, बोराची आवक वाढती

नगर बाजार समितीत मागील आठवड्यात दर दिवसाला बोराची ६० क्विंटलपर्यंत आवक होऊन एक हजार ते साडेतीन हजार तर पेरूची ३२ क्विंटलपर्यंत आवक होऊन ५०० ते चार हजार रुपयांचा दर मिळाला आहे.

मोसंबीची १३ क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ते १० हजार, संत्र्याची १२ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ७ हजार, डाळिंबाची १० क्विटंलपर्यंत आवक होऊन २ हजार ते सोळा हजार, पपईची २० क्विटंलपर्यंत आवक होऊन ४०० ते २ हजार, सीताफळाची १९ क्विंटलपर्यंत आवक होऊन १५०० ते सहा हजार, कलिंगडाची २० क्विंटलपर्यंत आवक होऊन ४०० ते एक हजार रुपयांचा दर मिळाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com