Vegetable Rate : बहुतांश भाजीपाल्यांची आवक स्थिर

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ३०) भाजीपाल्यांची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. आवक घटल्याने गाजर, काकडी, कोबीच्या दरांत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती.
Vegetable Rate
Vegetable RateAgrowon

पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Pune APMC) रविवारी (ता. ३०) भाजीपाल्यांची (Vegetable) सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. आवक (Vegetable Arrival) घटल्याने गाजर, काकडी, कोबीच्या दरांत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती. तर इतर बहुतांश भाजीपाल्याच्या आवक आणि मागणी संतुलित राहिल्याने दर (Vegetable Rate) स्थिर होते.

Vegetable Rate
Vegetable Grafting : भाजीपाला कलम तंत्रज्ञानाचे फायदे काय आहेत?

आवकेमध्ये परराज्यांतील कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून ४ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून २ टेम्पो शेवगा, इंदूर येथून २ टेम्पो गाजर, गुजरात येथून २ टेम्पो भुईमूग शेंगा, मध्य प्रदेशातून लसूण सुमारे ६ ट्रक आवक झाली होती.

तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार पोती, टोमॅटो सुमारे १० हजार क्रेट्‌स, फ्लॉवरसह तांबडा भोपळा, हिरवी आणि ढोबळी मिरची प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, कोबी ५ टेम्पो, गाजर ५ टेम्पो, मटार १०० गोणी, भेंडी आणि गवार प्रत्येकी ५ टेम्पो, कांदा सुमारे ७० ट्रक, आग्रा, इंदूर, स्थानिक भागातून बटाटा ५० ट्रक आवक झाली होती.

Vegetable Rate
Vegetables Rate : पुण्यात भाजीपाल्यांचे दर स्थिर

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव

कांदा : २५०-३३०, बटाटा : २२०-३००. लसूण : १५०-५००, आले : २००-४५०, भेंडी : २००- ३००, गवार : गावरान व सुरती ३००-५००, टोमॅटो : २००-२५०, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : ३००-४००, दुधी भोपळा : २००-२५०, चवळी : २००-३००, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी :२००-२५०, पापडी : ३००-४००, पडवळ : २००-२५०, काकडी : २५०-३००, फ्लॉवर : १२०-१६०, कोबी : २००-२५०, वांगी : २५०-४५०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : ४००-४५०, तोंडली : कळी ४००-५००, जाड : २००-२५०, शेवगा : १०००-१२००, गाजर : ३००-४००, वालवर : ४००-५००, बीट : २५०-३००, घेवडा : ३००-४५०, कोहळा : १००-१५०, आर्वी :२००-२५०, घोसावळे : ३००-३५०, ढेमसे : २००-२५०, भुईमूग शेंग : ५००-५५०, मटार : स्थानिक: १२००-१६००, पावटा : ४५०- ५००, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दोन लाख, तर मेथीची ६० हजार जुड्यांची आवक झाली होती.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव

कोथिंबीर : १०००-२५००, मेथी : १२००-१८००, शेपू : ६००-८००, कांदापात : ८००-१६००, चाकवत : ४००-७००, करडई : ५००- ७००, पुदिना : ३००-६००, अंबाडी : ५००-६००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ४००-६००, चुका : ८००-१२००, चवळई : ४००-६००, पालक : १०००-१५००.

दिवाळीनंतर बाजारात फुलांची आवक आणि मागणी संतुलित राहिल्याने, झेंडूचे दर स्थिर असून, इतर सर्व फुलांच्या दरांमध्ये अंशतः घट झाली आहे.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे ः

झेंडू : ३०-८०, गुलछडी : ५०-८०, अॅस्टर : (जुड्या) : ८०-१००, बिजली : ४०-८०, कापरी : १०-५०, शेवंती : ३०-५०, (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : ३०-६०, गुलछडी काडी : १०-५०, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, लिली बंडल : ८-१२, जरबेरा : ३०-५०, कार्नेशियन : ८०-१२०़ शेवंती काडी : १००-२००, आॅर्चिड : ३००-४००, ग्लॅडिओ (१० काड्या) ६०-१००़

फळ बाजार

फळ बाजारात रविवारी (ता.३०) लिंबांची सुमारे दीड हजार गोणी, डाळिंब ४० टन, पपई १५ टेम्पो, चिकू ६०० बॉक्स, मोसंबी ७० टन, संत्रा २५ टन, पेरू सुमारे २० टन कलिंगड १०, तर खरबूज २ पिकअप, सीताफळ ३० टन आवक झाली होती. तर बोरांचा हंगाम सुरू झाला असून, सोलापूर जिल्ह्यामधून विविध बोरांची सुमारे २० ते २५ गोणी आवक झाली होती.

विविध फळांचे दर पुढीलप्रमाणे

लिंबे (गोणीस) - ३००-६००, डाळिंब (किलो) गणेश - १०-४०, भगवा ५०-२००, आरक्ता २०-८०, पपई प्रति किलो -१२-२५, पेरू (२० किलो) -२००-५००, सीताफळ - १५-७०, कलिंगड २०-२५ खरबूज ३०-४५, मोसंबी ३ डझन २२०-३५०, ४ डझन १२०-२१०. संत्रा (१० किलो) २००-५००. बोरांची प्रति किलोचे दर चण्यामण्या - १००-१३०, चेकनट ९०-१००, चमेली २८-३२, उमराण १५ ते २०.

मटण-मासळी

थंडी सुरू झाल्याने गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता.३०) मासळीच्या आवकेत घट झाली होती. विविध मासळींच्या दरांत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती. यामध्ये प्रामुख्याने पापलेट, सुरमई, हलवा आणि रावस यांचा समावेश होता. तर चिकन आणि मटणाचे दर स्थर असून, अंड्यांमध्ये गावरान अंड्यांच्या शेकड्यामागे ५० ते ६० रुपयांनी, तर इंग्लिश अंड्यामध्ये २० रुपयांची वाढ झाली होती.

मासळीच्या आवकेत खोल समुद्रातील मासळीची सुमारे १० टन, खाडीची सुमारे ४०० किलो, तर नदीच्या मासळीची सुमारे ५०० किलो आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे १५ टन आवक झाली होती.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर)

पापलेट : कापरी : १६००-१८००, मोठे : १४००-१५००, मध्यम : ९००-१०००, लहान : ७००-८००, भिला : ५५०-६००, हलवा : ५५०-६००, सुरमई : ५५०-६५०, रावस : ६००-७००, मोठा ः ८०० - ९००, घोळ : ६००-७००, करली : २८०-३२०, करंदी (सोललेली) : ४००-४४०, भिंग : ३००-३५०, पाला : ७००-१२००, वाम : ५५०-६००, ओले बोंबील : १२०-१८०.

कोळंबी : लहान १२०-२८०, मोठी : ३६०-५५०, जंबो प्रॉन्स : १०००-१२००, किंग प्रॉन्स : ७००-७५०, लॉबस्टर : १६००-१८००, मोरी : २००-२८०, मांदेली : १००-१४०, राणीमासा : १००-१६०, खेकडे : २००-२८०, चिंबोऱ्या : ४८०-५५०.

खाडीची मासळी : सौंदाळे : २००-२४०, खापी : १६०-२००, नगली : ३६०-४००, तांबोशी : ३२०-४००, पालू : २४०-२८०, लेपा : १२०-१६०, बांगडा : लहान १००-१४०, मोठा १४०-१६०, शेवटे : २००-२४०, पेडवी : ८०-१००, बेळुंजी : १००-१२०, तिसऱ्या : २४०, खुबे : १००-१२०, तारली : १४०-१६०.

नदीतील मासळी : रहू : १६०-१८०, कतला : १६०-१८०, मरळ : ४४०-४८०, शिवडा : १८०-२२०, खवली : २००-२४०, आम्ळी : १००-१४०, खेकडे : ३००-३४०, वाम : ५००-५६०, चिलापी ः ५०-६०,

मटण : बोकडाचे ७००, बोलाईचे ७००, खिमा ७००, कलेजी ७४०.

चिकन २२०, लेगपीस २७०, जिवंत कोंबडी १५०, बोनलेस ३२०.

अंडी : गावरान (शेकडा) ९४०, डझन १२०, प्रतिनग १०. इंग्लिश (शेकडा) ५५०, डझन ७०, प्रतिनग ६.००.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com