Turmeric Rate : हिंगोली, वसतम बाजार समित्यांतील लिलाव बंद

वायदे बाजारातील हळदीचे व्यापार रद्द करावेत, अशी मागणी मराठवाडा विदर्भ शेतकरी, व्यापारी महासंघातर्फे केंद्र शासनाकडे करण्यात आली.
Turmeric
TurmericAgrowon

हिंगोली ः वायदे बाजारातील हळदीचे व्यापार (Turmeric Future Ban) रद्द करावेत, अशी मागणी मराठवाडा विदर्भ शेतकरी, व्यापारी महासंघातर्फे केंद्र शासनाकडे करण्यात आली. परंतु त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला गेला नसल्यामुळे शासनावर दबाव टाकण्यासाठी गुरुवारपासून (ता. ८) सोमवारपर्यंत (ता. १२) हिंगोली आणि वसमत येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांतील शेतीमालाचे लिलाव बंद (Agriculture Produce Auction Closed) राहणार आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्या बंदमध्ये सहभागी आहेत. दुसरीकडे हळद उत्पादकांच्या (Turmeric Producer) हितासाठी वायदे बाजारातील निकषात सुधारणा करण्याची मागणी आहे.

Turmeric
Turmeric Future Market : हळद ‘एनसीडीईएक्स’च्या वायदे बाजारातून बाहेर काढा

मराठवाडा विदर्भात देशातील उत्पादनाच्या ५० टक्के तर जगातील उत्पादनाच्या सुमारे ४५ टक्के हळदीचे उत्पादन होते. या भागातील बाजारपेठांमध्ये वर्षातील १२ महिने हळदीचा मोठा व्यापार चालतो. वायदे बाजारात मोजके व्यापारी सोयीनुसार दर ठरवून हळदीचा व्यापार सुरू करतात. त्याचा फायदा विशिष्ट वर्गाला होतो. यातून तोडगा काढण्याची मागणी व्यापारी, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी केली आहे.

मराठवाडा, विदर्भातील हळदीबाबत वायदे बाजारातील अटींत सुधारणा कराव्या. शेतकरी, व्यापारी, खरेदीदारांना विचारात घेऊन निकष ठरवावे. -
गंगाधर शृंगारे, दत्त गुरू फार्मर्स कंपनी, शिवणी, ता. कळमनुरी
व्यापारी महासंघातर्फे बंद आहे. बाजार समितीचे कामकाज सुरू आहे. सध्या हळदीची एक-दोन दिवसाआड आवक होत आहे. सोयाबीनची आवक सुरू नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची फारशी गैरसोय होणार नाही.
एस. एन. शिंदे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत
वायदे बाजारातील दर आणि प्रत्यक्ष बाजारपेठेच्या दरातील तफावतीमुळे या भागातील शेतकरी तसेच व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे तत्काळ वायदे बाजारातील हळदीचा व्यापार बंद करण्याची गरज आहे.
गजानन घुगे, अध्यक्ष, मराठवाडा विदर्भ हळद शेतकरी व्यापारी महासंघ, हिंगोली
व्यापारी महासंघाच्या मागण्यांसाठी चार दिवसांसाठी बंद आहे. त्यात दोन दिवस सुट्ट्या आहेत. बंद त्यापुढे सुरू राहिला तर शेतकऱ्यांची गैरसोय होईल. त्यासाठी वायदे बाजारप्रश्‍नी लवकर तोडगा निघणे आवश्यक आहे.
नारायण पाटील, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगोली

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com