
जालना: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Jalna APMC) गत आठवडाभरात सोयाबीनची ३३ हजार ६२२ क्विंटल आवक (Soybean Arrival) झाली. या सोयाबीनला सरासरी ५२०० ते ५४०० प्रतिक्विंटल दरम्यान दर (Soybean Rate) मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात बाजरीची ५७६ क्विंटल आवक झाली. ५ ते १० डिसेंबर दरम्यान आवक झालेल्या या बाजरीला सरासरी २६५० ते २०१८ रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. हरभऱ्याची एकूण आवक ५०९ क्विंटल झाली. या हरभऱ्याला सरासरी ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
मुगाची आवक अल्पच राहिली. एकूण ११० क्विंटल आवक झालेल्या मुगाचे सरासरी दर ६,३०० ते ७५०० एक रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिले. मकाची एकूण आवक ७३७३ क्विंटल झाली. या मकाला सरासरी २००० रुपये प्रती क्विंटलचा दर मिळाला. पांढऱ्या तुरीची एकूण आवक अत्यल्प म्हणजे केवळ ७८ क्विंटल झाली.
या पांढऱ्या तुरीला सरासरी ५८५० ते ७१२५ रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. शाळू ज्वारीची एकूण आवक १२३८ क्विंटल झाली. या ज्वारीला सरासरी ३३०० ते ३३५० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. गव्हाची एकूण आवक १३८६ क्विंटल झाली. या गव्हाला सरासरी २७५० ते २७७५ रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
रेशीम कोषांची ६२ क्विंटल आवक
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रायोगिक तत्त्वावर रेशीम कोष खरेदी बाजारपेठ सुरू आहे. या बाजारात ७ व ८ डिसेंबरला अनुक्रमे ४७ व १५ क्विंटल मिळून ६२ क्विंटल रेशीम कोशाची आवक झाली. या रेशीम कोषांना ५४ हजार ते ५४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान सरासरी दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
एक वेळ सूर्यफुलाची तर दोन वेळ उडीदाचीही आवक
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५ डिसेंबरला एक क्विंटल आवक झालेल्या सूर्यफुलाला ४ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. उडदाची ५ व ६ डिसेंबरला आवक झाली. अनुक्रमे १ व ८ क्विंटल आवक झालेल्या उडदाचे सरासरी दर ५००० ते ५५०० प्रतिक्विंटल दरम्यान राहिले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.