Vegetable Market : आवकेमध्ये सरासरीच्या तुलनेत वाढ

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ४) भाजीपाल्याची सुमारे ९५ ट्रक आवक झाली होती.
Market Committee
Market CommitteeAgrowon

पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Market Committee) रविवारी (ता. ४) भाजीपाल्याची सुमारे ९५ ट्रक आवक झाली होती. रब्बी हंगामातील भाजीपाल्याचे उत्पादन (Vegetable Production) सुरळीत सुरू झाल्याने आवकेमध्ये सरासरीच्या तुलनेत वाढ झाली होती.

Market Committee
Farmer Incentive Scheme : पहिल्या यादीतील २८८ जणांचे आधार प्रमाणीकरण अजूनही बाकी

भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, तमिळनाडू आणि गुजरात येथून सुमारे १५ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून ३ टेम्पो शेवगा, राजस्थान येथून १० टेम्पो गाजर, गुजरात येथून २ टेम्पो भुईमूग शेंगा, पंजाब आणि मध्य प्रदेशातुन मटार १५ ट्रक, तमिळनाडू येथून तोतापुरी कैरी १ टेम्पो, कर्नाटकातून घेवडा आणि पावटा प्रत्येकी ३ टेम्पो, तर मध्य प्रदेशातून लसूण सुमारे १२ ट्रक तर बंगलोर येथून आले १ ट्रकची आवक झाली होती.

तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार २०० गोणी, टोमॅटो सुमारे १० हजार क्रेट्‌स, फ्लॉवर १४ टेम्पो, सिमला मिरची आणि तांबडा भोपळा प्रत्येकी १० टेम्पो, कोबी ५ टेम्पो, भेंडी आणि गवार प्रत्येकी ७ टेम्पो, कांदा सुमारे १०० ट्रक, आग्रा, इंदूर, स्थानिक भागातून बटाटा ३० ट्रक आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव ः कांदा : १००-१४०, बटाटा : १७०-२२०. लसूण : १५०-४५०, आले : २००-४००, भेंडी : ३००- ४००, गवार : गावरान व सुरती ५००-६००, टोमॅटो : ८०-१००, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : २००-२५०, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : २५०-३००, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी :१६०-१८०, पापडी : २५०-३००, पडवळ : २००-२५०, काकडी : १५०-२००, फ्लॉवर : ५०-६०, कोबी : ६०-८०,

वांगी : १००-२००, डिंगरी : ३००-३५०, नवलकोल : ७०-८०, ढोबळी मिरची : १५०-२५०, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १५०-२००, शेवगा : ११००-१२००, गाजर : २००-३००, वालवर : २५०-३००, बीट : २५०-४५०, घेवडा : २००-२५०,कोहळा : १००-१५०, आर्वी :२००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २५०-३००, भुईमूग शेंग : ५००-५५०, मटार : ३५०-४००, पावटा : ४००- ५००, तांबडा भोपळा : १००-१५०, कैरी तोतापुरी - ८००-९००, सुरण : २००-२२०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

Market Committee
PDKV Crop Verity : ‘पंदेकृवि’च्या तीन वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरची सुमारे सव्वा लाख, तर मेथीची ८० हजार जुड्यांची आवक झाली होती.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ८००-१२००, मेथी : ३००-६००, शेपू : ८००-१०००, कांदापात : ८००-१२००, चाकवत : ४००-६००, करडई : ४००- ५००, पुदीना : ३००-८००, अंबाडी : ४००-७००, मुळे : ८००-१५००, राजगिरा : ४००-७००, चुका : ८००-१०००, चवळई : ४००-६००, पालक : ८००-१२००.

फळ बाजार

फळ बाजारात रविवारी (ता.४) लिंबाची सुमारे ५ हजार गोणी आवक झाली होती. इतर आवकेमध्ये डाळिंब ३० टन, पपई १० टेम्पो, चिकू सुमारे एक हजार गोणी आणि बॉक्स, मोसंबी ४० टन, संत्रा ३० टन, पेरू सुमारे दीड हजार क्रेट, कलिंगड ८ तर, खरबूज ३ पिकअप, सीताफळ ५० टन आवक झाली होती. तर सोलापूर जिल्ह्यांमधून विविध बोरांची सुमारे दीड हजार गोणी आवक झाली होती.

विविध फळांचे दर पुढीलप्रमाणे : लिंबे (गोणीस) - १००-२५०, डाळिंब (किलो) गणेश - १०-५०, भगवा ८०-२५०, आरक्ता ६०-१२०, पपई प्रति किलो -१०-२५, पेरू (२० किलो) -२५०-३५०, सीताफळ - २०-१५०, कलिंगड ७-१० खरबूज २०-३०, मोसंबी ३ डझन ३२०-५३०, ४ डझन १२०-१६०. संत्रा (१० किलो) २००-६००. बोरांची प्रति १० किलोचे दर चण्यामण्या - ३५०-४५०, चेकनट ४५०-५५०, चमेली १८०-२५०,

उमराण ८० - १२०

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-२५, गुलछडी : २०-४०, अ‍ॅस्टर (४ जुड्या) ः ८-१५, सुटा ५०-८०, कापरी : १०-३०, शेवंती : १०-३५, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १५-३५, गुलछडी काडी : २०-८०, डच गुलाब (२० नग) : ५०-४००, जरबेरा : ३०-५०, कार्नेशियन : १५०-२५०, शेवंती काडी १५०-२५०, लिलियम (१० काड्या) ८००-१२००, ऑर्चिड ४००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ६०-१००, चमेली : १०००-१२००, जिप्सोफिला : ४००-६००.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com