Soybean Rate : हिंगोलीत सोयाबीनला सरासरी ५१९० रुपये दर

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजार (भुसार मार्केटमध्ये) शुक्रवारी (ता.४) सोयाबीनची १६०० क्विंटल आवक होती.
soybean rate
soybean rate agrowon

हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत (Hingoli APMC) धान्य बाजार (भुसार मार्केटमध्ये) शुक्रवारी (ता.४) सोयाबीनची १६०० क्विंटल आवक (Soybean Arrival) होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ४६५५ ते कमाल ५७२५ रुपये, तर सरासरी ५१९० रुपये दर (Soybean Rate) मिळाले.

soybean rate
Soybean Rate : सोयाबीनच्या दरात पुन्हा सुधारणा

हिंगोली बाजार समितीत सोमवार (ता. ३१) ते शुक्रवार (ता. ४) या कालावधीत सोयाबीनची १० हजार ६४५ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल सरासरी ४८४५ ते ५१९० रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. ३१) सोयाबीनची २५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४४०० रुपये ते कमाल ५२९० रुपये, तर सरासरी ४८४५ रुपये दर मिळाले.

soybean rate
Soybean Harvesting : बाजरी, सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात

मंगळवारी (ता.१) सोयाबीनची २५४५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४४८० ते कमाल ५२९९ रुपये, तर सरासरी ४८९९ रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. २) सोयाबीनची २२०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४५०० ते कमाल ५६५१, तर सरासरी ५०७५ रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता.३) सोयाबीनची १८०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४६५५ ते कमाल ५५९० रुपये, तर सरासरी ५१२२ रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. ४) सोयाबीनची १६०० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल किमान ४६५५ ते कमाल ५७२५, तर सरासरी ५१९० रुपये मिळाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com