Tur Market : हिंगोलीत तुरीला सरासरी ८ हजार २९८ रुपये दर

Aajcha Bazar Bhav : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत धान्य बाजारात (भुसार माल) सोमवार (ता.१७) ते शुक्रवार (ता.२१) या कालावधीत तुरीची क्विंटल ११९१ आवक झाली.
Tur Market
Tur MarketAgrowon

Tur Market Update हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत धान्य बाजारात (भुसार माल) सोमवार (ता.१७) ते शुक्रवार (ता.२१) या कालावधीत तुरीची (Tur Arrival) क्विंटल ११९१ आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान ७८०० ते कमाल ८७९५ रुपये तर सरासरी ८२९८ रुपये दर मिळाले.

शुक्रवारी (ता.२१) तुरीची ६८६ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान ८२६५ ते कमाल ८७९५ रुपये तर सरासरी ८५३० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता.१९) १६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ८०८० ते कमाल ८५८५ रुपये तर सरासरी ८३३२ रुपये दर मिळाले.

Tur Market
Tur Processing Industry : शेतकरी कंपनीची डाळ उद्योगात गगन भरारी

मंगळवारी (ता.१८) तुरीची १९० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८००५ ते कमाल ८५६० रुपये तर सरासरी ८२८२ रुपये दर मिळाले. सोमवारी (ता.१७) तुरीची १५५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७८०० ते कमाल ८३२५ रुपये तर सरासरी ८०६२ रुपये दर मिळाले.

Tur Market
Tur Market : व्यापाऱ्यांचा म्यानमारमध्ये तुरीचा स्टाॅक?

एप्रिलमध्ये दरात ७५ ते ३४५ रुपयांनी वाढ

‘‘तुरीची सध्या स्थानिक परिसरातून आवक होत आहे. यंदा जिल्ह्यात तुरीच्या उत्पादकतेत घट झाली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत आवक कमी आहे. त्यामुळे दरात तेजी आहे.

गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात तुरीच्या कमाल दरात ७५ ते ३४५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आवक वाढली आहे,’’ असे हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com