Banana : खानदेशात केळीची आवक घटली

खानदेशात मागील आठ ते १० दिवसांत केळीची आवक आणखी घटली आहे.
Banana
BananaAgrowon

जळगाव ः खानदेशात मागील आठ ते १० दिवसांत केळीची आवक (Banana Arrival Khandesh) आणखी घटली आहे. कमाल दर २३२० रुपये प्रतिक्विंटल तर किमान दर (Banana Rate) १२०० रुपये आहेत. सरासरी दर २००० रुपये सध्या मिळत आहे.

केळीची सध्या खानदेशात प्रतिदिन सरासरी १६० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) आवक (Average Arrival Of Banana) होत आहे. १० दिवसांपूर्वीची आवक प्रतिदिन सरासरी १८० ट्रक होती. आवकेत सतत घट होत आहे. दर्जेदार केळीला जामनेर, रावेर, मुक्ताईनगर भागात २६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर या आठवड्यात मिळाला आहे. हिवरखेडा (ता. जामनेर) येथील उमेश महाजन यांच्या निर्यातक्षम केळीला कमाल २८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

Banana
केळी दरात सुधारणा सुरूच

नायगाव (ता. मुक्ताईनगर) येथील विशाल किशोर महाजन, ऋषी महाजन यांच्या केळीलाही प्रतिक्विंटल २६०० रुपये दर या आठवड्यात मिळाला आहे. दरात सतत सुधारणा होत आहे. पण आवक कमी होत आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातही प्रतिदिन सरासरी १०० ट्रक केळीची आवक होत आहे. तेथेही कमाल दर २६०० रुपये प्रतिक्विंटलवर आहेत.

Banana
वादळी पावसामुळे शेकडो एकर केळी बागा उद्ध्वस्त

उत्तर भारतात पंजाब, काश्मीर, दिल्ली, उत्तर प्रदेशात केळीची मागणी आहे. गुजरात व दाक्षिणात्य भागातून उत्तरेकडे केळीची पाठवणूक कमी आहे. यामुळे खानदेशातील केळीला उठाव असून, दरात सतत सुधारणा झाली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, शहादा, अक्कलकुवा भागातही केळीची आवक घटली आहे. जिल्ह्यातही प्रतिदिन सरासरी ४० ट्रक केळीची आवक होत आहे. कुकुंभर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही) मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांच्या केळीची हानी झाली. यामुळे सध्या कापणीवर हवी तेवढी केळी नाही. परिणामी आवक कमी आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com