Banana Market : खानदेशात केळीची आवक घटली

खानदेशात केळीची आवक सध्या नीचांकी स्थितीत असून, रोज ११० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे.
Banana Market | Banana Rate | Banana Harvesting
Banana Market | Banana Rate | Banana HarvestingAgrowon

जळगाव ः खानदेशात केळीची आवक (Banana Arrival) सध्या नीचांकी स्थितीत असून, रोज ११० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. कांदेबाग केळीमधील काढणी (Banana Harvesting) मागील पंधरवड्यातच संपली आहे. थंडीत केळीला मागणी कमी असते. परंतु यंदा थंडीच्या काळातही दर (Banana Rate) टिकून आहेत. दर प्रति क्विंटल किमान ८०० ते कमाल १५०० रुपयांपर्यंत आहेत. कारण आवक अत्यल्प आहे.

Banana Market | Banana Rate | Banana Harvesting
Red Banana : लाल केळीचे आरोग्यदायी फायदे

सध्या धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर भागातील पिलबाग (खोडवा) केळीत केळीची काढणी सुरू आहे. या बागांत केळी लवकर पक्व होत नाहीत. थंडीच्या काळात केळी पक्व होण्यास उशीर लागतो. यामुळेदेखील सध्या आवक कमी आहे. दर प्रति क्विंटल ८००, १०००, १२०० ते १५०० रुपयांपर्यंत मिळत आहेत. कमी दर्जाच्या केळीतही काढणी होत आहे.

दर्जेदार केळीची पाठवणूक काश्मीर, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेशात केली जात आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातही केळीची आवक महिनाभरापासून कमी आहे. तेथेही रोज १०० ते ११० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. मध्य प्रदेशातही नर्मदा, तापी नदीच्या क्षेत्रात फारशी केळी काढणीवर उपलब्ध नाही. जळगाव जिल्ह्यात उशिरा लागवडीच्या कांदेबाग केळी बागा, जुनारी व पिलबागांतून केळीची आवक होत आहे. ही आवकदेखील पुढे कमी होईल.

सध्या देशात गुजरात, आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेशातही केळी हवी तशी काढणीवर नाही. यामुळे खानदेशातील केळीला उत्तरेकडे मागणी किंवा उठाव आहे. पुढेही दर स्थिर राहतील. राज्यात सोलापूर जिल्ह्यात टेंभूर्णी व लगत केळीची काढणी सुरू आहे. तेथून केळीची परदेशात अधिकची निर्यात होत आहे. जळगावातही दर्जेदार केळीची परदेशात काही कंपन्या निर्यात करीत आहेत.

यामुळे बाजारात केळीची अधिक आवक किंवा दरांवरील दबाव ही स्थिती नाही, असे जाणकार सांगत आहेत. नवती किंवा मृग बहर (जून ते ऑगस्टमधील लागवडीच्या बागा) केळी बागांमधून अद्याप आवक सुरू नाही. या बागांमधील आवक फेब्रुवारीत सुरू होईल. यामुळे केळी दर खानदेशात स्थिर राहतील, असे दिसत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com