Banana Market Update : खानदेशात केळी दरात घसरण सुरूच

Banana Market Rate : खानदेशात केळी दरात घसरण सुरूच आहे. आवक मागील सात ते आठ दिवसांत आणखी प्रतिदिन १५ ट्रकने (एक ट्रक १६ टन क्षमता) वाढली आहे.
Banana Market
Banana MarketAgrowon

Jalgaon Market News : खानदेशात केळी दरात (Banana Rate) घसरण सुरूच आहे. आवक मागील सात ते आठ दिवसांत आणखी प्रतिदिन १५ ट्रकने (एक ट्रक १६ टन क्षमता) वाढली आहे. सध्या किमान १००० व कमाल १८५० रुपये प्रतिक्विंटलचा दर केळीला मिळत आहे.

खानदेशात सर्वाधिक आवक रावेर, मुक्ताईनगर व यावल तालुक्यात होत आहे. दर्जेदार केळी बाजारात येत आहेत. परंतु आवक वाढल्याने दरांवर मागील २० ते २२ दिवसांत सतत दबाव वाढला आहे. मार्चच्या मध्यापर्यंतची आवक प्रतिदिन ८० ते ८५ ट्रक होती.

या काळात केळीची निर्यातही कमी होती. परंतु आवक कमी असल्याने दर २५०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक होते. परंतु या महिन्यात सुरुवातीला आवक वाढू लागली. यानंतर आवक सतत वाढली आहे. सध्या प्रतिदिन १२८ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक खानदेशात होत आहे.

Banana Market
Banana Crop Guidance : निंबोल येथे केळी पिकाबाबत मार्गदर्शन

धुळ्यातील आवक प्रतिदिन २० ट्रकपेक्षा अधिक आहे. नंदुरबारातही रोज २५ ते ३० ट्रक केळीची आवक होत आहे. नंदुरबारात शहादा, तळोदा व अक्कलकुवा भागात केळीची बऱ्यापैकी आवक होत आहे. जळगाव जिल्ह्यात रोज ७० ते ७५ ट्रक केळीची आवक रोज होत आहे. मध्य प्रदेशातही आवक वाढली आहे.

Banana Market
Banana Market Rate : खानदेशात केळी दर २६०० रुपयांवर स्थिर

केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारात प्रतिदिन ११० ट्रक आवक सध्या होत आहे. तेथेही कमाल १८५० व किमान ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.

काही खरेदीदार शेतकऱ्यांच्या अडचणी व आवक अधिक असल्याचा मुद्दा पुढे करून १८५० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा कमी दरात खरेदी करीत आहेत.

यामुळे शेतकऱ्यांचे आणखी नुकसान होत आहे. केळीचे दर रोज रावेर बाजार समिती जाहीर करीत आहे. परंतु मागील २० ते २२ दिवसांपासून केळीची अनेक भागात जाहीर दरांपेक्षा कमी दरात खरेदी केली जात आहे.

निर्यात वाढली

केळीची परदेशातील निर्यातही सध्या प्रतिदिन १५ कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) एवढी आहे. ही निर्यात या महिन्यात वेगात सुरू आहे. निर्यातीच्या केळीचे दर २००० रुपयांपेक्षा किंचित अधिक मिळत आहेत. निर्यातीची कार्यवाही खानदेशात ११ कंपन्या करीत आहेत. आखातातील दुबई, बहरीन, कतर, इराण, इराक येथे केळीची निर्यात केली जात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com