Banana Market : खानदेशात केळी दर स्थिर

Banana Market Rate : खानदेशात केळीचे दर स्थिर आहेत. स्थानिक बाजारात किमान १९०० व कमाल २५०० रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत.
Banana Market Update
Banana Market Update Agrowon

Jalgaon News : खानदेशात केळीचे दर (Banana Rate) स्थिर आहेत. स्थानिक बाजारात किमान १९०० व कमाल २५०० रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत. तर निर्यातीच्या (Banana Export) केळीस २८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.

केळीची काढणी वेग घेत आहे. खानदेशातून सध्या रोज १२ ते१३ कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची परदेशात निर्यात सुरू आहे.

सहा निर्यातदार कंपन्या यासंबंधी खानदेशात काम करीत आहेत. नंदुरबारातून रोज चार, धुळ्यातून दोन आणि जळगाव जिल्ह्यातून सहा ते सात कंटेनर केळीची परदेशात निर्यात होत आहे.

Banana Market Update
Banana Market : जळगावात केळी पट्ट्यात इराणच्या खरेदीदारांची पाहणी

तसेच स्थानिक बाजारातही सध्या रोज ८० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. केळीची आवक मागील सात ते आठ दिवसांत पाच ट्रकनी वाढली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर, यावल, जामनेर, चोपडा भागात गुणवत्तापूर्ण, निर्यातक्षम केळी उपलब्ध होत आहेत.

Banana Market Update
Banana Market Rate : खानदेशात केळी दर २६०० रुपयांवर स्थिर

थंडीमुळे निर्यातक्षम केळीची काढणी काहीशी लांबली. परंतु आता आवक सुरू झाली आहे. स्थानिक बाजारातील दरही स्थिर आहेत.

कमाल २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर स्थानिक बाजारात आहे. तसेच खोडवा केळी किंवा पिलबाग, कमी दर्जाच्या केळीचे दरही १९०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.

केळीचे दर मागील दीड ते दोन महिन्यापासून टिकून आहेत. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातही सध्या रोज ७० ते ८० ट्रक केळीची आवक होत आहे. तेथेही कमाल दर २७०० रुपये प्रतिक्विंटल, असा मिळत आहे. पंजाब, दिल्ली, काश्मिरात केळीला मागणी आहे.

तेथील खरेदीदार रावेर, फैजपूर (ता. यावल), सावदा (ता. रावेर), चोपडा व इतर भागातील एजंटच्या मदतीने केळीचा पुरवठा करून घेत आहेत. पुढे केळीची आवक आणखी वाढेल. रावेर, यावल, मुक्ताईनगर भागातील मृग बहर केळीमध्ये काढणीवरील केळी अधिकाधिक उपलब्ध होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com