बांगलादेशची गव्हासाठी आता भारतावरच भिस्त

आता बांगलादेशला भारताशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. चालू आर्थिक वर्षात बांगलादेशला भारतातून होणारी गव्हाची निर्यात ६२ लाख टनावर पोहोचण्याची चिन्हे आहेत.
बांगलादेशची गव्हासाठी आता भारतावरच भिस्त
Wheat ExportAgrowon

रशिया-युक्रेन (Russia-Ukraine) युध्द आणि जागतिक बाजारात गव्हाच्या (Wheat) दरात आलेली तेजी याचा मोठा फटका बांगलादेशला (Bangaladesh) बसला आहे. गेल्या काही वर्षांपासून बांगलादेश गव्हासाठी भारतावर (India) अवलंबून आहे. वास्तविक रशिया हा बांगलादेशसाठी गव्हाचा मुख्य पुरवठादार आहे.

परंतु रशियाचे युक्रेनशी युध्द सुरू असल्यामुळे तिथून पुरवठा आक्रसला आहे. त्यामुळे आता बांगलादेशला भारताशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. चालू आर्थिक वर्षात बांगलादेशला भारतातून होणारी गव्हाची निर्यात ६२ लाख टनावर पोहोचण्याची चिन्हे आहेत.

बांगलादेशला दरवर्षी ७५ लाख टन गहू लागतो. परंतु तिथं फक्त आठ लाख टन गव्हाचं उत्पादन होतं. बाकी गहू आयात करावा लागतो. गेल्या काही वर्षांपासून बांगलादेशची भारताकडून गहू आयात वाढत आहे. २०२०-२१ मध्ये बांगलादेशने भारताकडून १६ लाख टन गव्हाची आयात केली होती, तर २०२१-२२ मध्ये आयात ४०.८ लाख टनावर गेली. चालू आर्थिक वर्षात त्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

बांगलादेशला भारतीय गहू आयात करणे इतर देशांच्या तुलनेत परवडते. कारण भारतातून बांगलादेशमध्ये गहू घेऊन जाण्यासाठी वाहतूक खर्च कमी येतो. आणि वेळही कमी लागतो. १३ मे रोजी वाढत्या महागाईला रोखण्यासाठी भारताने गहू निर्यातीवर बंदी घातली. परंतु ज्या देशांची अन्नसुरक्षेच्या कारणासाठी गहू निर्यातीची मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे, त्यांना सरकारी पातळीवर गहू निर्यातीची मुभा देण्यात आली.

यंदा भारतात गव्हाच्या उत्पादनात घट झाली आहे. गहू काढणीच्या वेळी उष्णतेची लाट आल्याने उत्पादनाला मोठा फटका बसला. त्यामुळे भारतीय अन्न महामंडळ गव्हाच्या सरकारी खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करू शकले नाही.

दरम्यान, भारताने गहू निर्यातबंदी केल्यानंतर गव्हाच्या पिठाची मागणी वाढली आहे. पूर्व आशिया, उत्तर अमेरिका, इजिप्त या देशांकडून पिठाच्या मागणीत वाढ झाली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com