Soybean Rate : सोयाबीन दराच्या मुद्द्यावर दिल्लीत होणार मंथन

मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने देशाला तेलबियांसह खाद्यतेलाची आयात करावी लागते. देशांतर्गत उत्पादकता कमी असल्याने तेलबियांच्या दरात तेजी राहते.
soybean rate
soybean rate agrowon

नागपूर : दिवाळीत गरिबांना तेल स्वस्त मिळावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या शासनाने तेलबिया उत्पादकांची (Soybean Farmer) दिवाळीदेखील जोशात साजरी व्हावी याकरिता प्रयत्न करावा अशी अपेक्षा आहे. त्याकरिताच पाशा पटेल यांच्या नेतृत्वात मध्य प्रदेशच्या कृषिमंत्र्यांसह सोपा (SOPA) प्रतिनिधींचे शिष्टमंडळ केंद्रीय वाणिज्य व व्यापारमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांची दिल्लीत भेट घेणार आहे. सोमवारी (ता. १७) ही भेट होईल अशी शक्यता आहे.

soybean rate
Soybean Rate : जागतिक सोयाबीन उत्पादन खरचं वाढणार का?

मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने देशाला तेलबियांसह खाद्यतेलाची आयात करावी लागते. देशांतर्गत उत्पादकता कमी असल्याने तेलबियांच्या दरात तेजी राहते. प्रक्रिया उद्योजकांकडून या महागड्या तेलबियांची खरेदी केली जाते. त्यावर प्रक्रियाअंती उत्पादित तेलाचा दरही वाढता राहतो. ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारने आयात होणाऱ्या तेलावरील शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला.

soybean rate
Soybean Rate : सोयाबीनचे वायदे तातडीने सरु करा

गरिबांना स्वस्तात तेल मिळावे याकरिता अशा प्रकारचे धोरण केंद्र सरकारकडून राबविले जाते. मात्र त्याचा फटका देशांतर्गत तेलबिया उत्पादकांना बसतो. गेल्या वर्षी दहा हजार रुपये प्रति क्विंटल असलेल्या सोयाबीनचे दर केंद्र सरकारच्या याच धोरणामुळे यंदा पाच हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारने धोरणात बदल करावा व सोयाबीन उत्पादकांना दिलासा द्यावा या मागणीकरिता मध्य प्रदेशचे कृषिमंत्री कमल पटेल, शेतीमाल विपणन विषयाचे अभ्यासक पाशा पटेल, सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रतिनिधी अशा सर्वांचा समावेश असलेले शिष्टमंडळ १७ ऑक्टोबर रोजी दिल्लीत केंद्रीय वाणिज्य व व्यापारमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेणार आहे.

भारतात वीस हजार टन तेल हे शून्य आयात शुल्काच्या माध्यमातून आणले जाते. हे थांबवत भारतातच तेलबिया लागवडीला प्रोत्साहन दिले तर उत्पादकांना सहा ते साडेसहा हजार रुपयांचा दर देणे शक्य आहे. आजवर आयात शुल्क माफीच्या माध्यमातून इंडोनेशिया आणि मलेशियाच्या शेतकऱ्यांना ७०००० कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.

हाच निधी भारतातील शेतकऱ्यांसाठी वापरला असता, तर त्यांना अधिकचा दर मिळत तेलबिया लागवडीलाही प्रोत्साहन मिळाले असते. परिणामी, केंद्र सरकारने गरिबांना स्वस्त तेल मिळावे याकरिता प्रयत्न करण्यासोबतच सोयाबीन उत्पादकांनादेखील चांगला दर कसा मिळेल याकरिता धोरण राबवावे अशी मागणी या भेटीत केली जाणार आहे.

...या आहेत मागण्या

- ऑइल केक इम्पोर्टवर बंदी

- जागतिक स्तरावर सोयाबीनचे उत्पादन हेक्टरी तीस क्विंटल तर भारतात दहा क्विंटल इतके अत्यल्प आहे. त्याची दखल घेत नव्या उत्पादनक्षम वाणावर संशोधन व उपलब्धता.

- सोया पेंडला निर्यात अनुदान.

सोयाबीनच्या बाबतीत मध्य प्रदेशने देशाचे नेतृत्व करावे अशी अपेक्षा आहे. देशात सर्वदूर संततधार पावसामुळे उत्पादकता कमी झाली आहे. त्यातच भावातही घसरण झाल्यामुळे सोयाबीन उत्पादकांसमोर नवी अडचण निर्माण झाली आहे. सोयाबीन उत्पादकांच्या अशाच प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी केंद्रीय वाणिज्य व व्यापारमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेण्याचे प्रस्तावित आहे. १७ ऑक्टोबर रोजी दिल्लीत ही भेट होईल. या वेळी मध्य प्रदेशचे कृषिमंत्री कमल पटेल तसेच सोपा प्रतिनिधी सोबत असतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com