Ethanol Production : ब्राझील इथेनॉलकडून साखरेकडे वळण्याची शक्यता

ब्राझीलमध्ये सातत्याने इंधनाच्या किमतीत घट होत असल्याने नव्या हंगामात (२०२२-२३) ब्राझीलचे साखर कारखाने इथेनॉल पेक्षा साखरेला महत्त्व देण्याची शक्यता आहे.
Ethanol Production
Ethanol ProductionAgrowon

कोल्हापूर : ब्राझीलमध्ये सातत्याने इंधनाच्या किमतीत (Fuel Price Brazil) घट होत असल्याने नव्या हंगामात (२०२२-२३) ब्राझीलचे साखर कारखाने (Brazil Sugar Industry) इथेनॉल (Ethanol) पेक्षा साखरेला (Sugar Production) महत्त्व देण्याची शक्यता आहे.

Ethanol Production
Sugar Export : उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यात साखर निर्यातीवरून धुसफूस ?

ब्राझीलमध्ये साखर कारखाने इथेनॉलच्या तुलनेत अधिक साखर उत्पादनाकडे वळत आहेत. कारण देशात इंधन, खास करून पेट्रोलवरील करात कपात करण्यात आल्याने जैव इंधनाच्या किमतींमध्ये घसरण झाली आहे. ब्राझीलमध्ये सध्या सुरू असणाऱ्या अंतिम टप्यातील हंगामात (२०२१-२२) ही इथेनॉल निर्मितीत घट सुरू आहे

Ethanol Production
Sugar Mills : गत हंगामातील महसूल विभागणी सूत्र यंदाच्या हंगामापूर्वीच निश्चित करा

‘जॉब इकोनोमिया’ या संस्थेने ब्राझील मधील साखर उत्पादनाबाबतचा नवा अंदाज वर्तविला आहे. एप्रिलमध्ये वर्तविलेल्या अंदाजाच्या तुलनेत सध्या वर्तवलेल्या अंदाजामध्ये येत्या हंगामात उसाचे उत्पादन वाढेल, असा अंदाज आहे. एप्रिलच्या अंदाजामुळे संस्थेने ३३५ लाख टन साखर ब्राझीलमध्ये तयार होईल, असा अंदाज व्यक्त केला होता.

गेल्या चार महिन्यात ब्राझीलमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने संस्थेने अंदाजात वाढ करत साखरेचे उत्पादन ३४८ लाख टनापर्यंत होईल, असे सांगितले आहे. एप्रिलमध्ये इथेनॉलचे उत्पादन ३०.२ बिलियन लिटर होईल, असा अंदाज होता. संस्थेने नव्या अंदाजात सुधारणा करताना इथेनॉलचे उत्पादन २९.१ बिलियन लिटरपर्यंत जाईल, असे सांगितले आहे.

Ethanol Production
Ethanol Rate : यंदाही इथेनॉलच्या दरात वाढ होण्याची शक्यता

ब्राझीलमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने इंधनाच्या किमतीत घट होत आहे. यामुळे इथेनॉल निर्मिती करणे काहीसे नुकसानीचे ठरू शकते. ब्राझीलमध्ये दुष्काळ असल्याने उसाची लागवड कमी झाली असली तरी गेल्या काही दिवसांपासून ऊस पट्ट्यामध्ये चांगला पाऊस झाला आहे. यामुळे लागवड केलेल्या उसाची वाढ चांगली होईल, असा अंदाज संस्थेचा आहे.

साखरेच्या उत्पादनवाढीचा अंदाज

सुरवातीच्या टप्प्यात यंदा ब्राझीलमध्ये कमी साखर उत्पादित होईल, असा अंदाज होता. पण नव्या अंदाजानुसार इथेनॉलकडे वळणारे काही कारखाने यंदा इथेनॉल पेक्षा साखरेला पसंती देण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. उसाचे उत्पादन कमी असले तरी इथेनॉल निर्मितीत घट होणार असल्याने साखरेचे उत्पादन वाढू शकते, असे संस्थेच्या अंदाजात म्हटले आहे.

दोन वर्षांत भारताला फायदा

ब्राझीलच्या बहुतांश साखर कारखान्यांनी गेल्या दोन-तीन वर्षांपासून इथेनॉल निर्मितीकडे मोर्चा वळवल्याने साखरेच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. त्याचाच फायदा भारताला झाला आहे. गेल्या वर्षी दुष्काळ असल्याने ब्राझीलमध्ये गरजेपेक्षा कमी साखर निर्मिती झाली. यामुळे भारतीय साखरेला जगाच्या बाजारपेठेत चांगले दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com