Sugar : ब्राझीलच्या साखरेचा एप्रिलनंतर धोका

केंद्राने निर्यात मर्यादित केल्याने साखर कारखानदारांना आता निर्यातीसाठी धावपळ करावी लागणार आहे. ब्राझीलचा हंगाम एप्रिल २०२३ पासून सुरू होत आहे.
Sugar Export
Sugar Export Agrowon

कोल्हापूर : केंद्राने निर्यात मर्यादित केल्याने साखर कारखानदारांना (Sugar Industry) आता निर्यातीसाठी (Sugar Export) धावपळ करावी लागणार आहे. ब्राझीलचा हंगाम एप्रिल २०२३ पासून सुरू होत आहे. गेल्या काही वर्षांपासून इथेनॉलकडे (Ethanol Production) वळलेल्या ब्राझीलच्या कारखानदारांनी आता साखरेकडे आपला मोर्चा वळवला आहे. एप्रिल २०२३ नंतर ब्राझीलची साखर मोठ्या प्रमाणात जागतिक बाजारात येण्याची शक्यता आहे. एप्रिलपर्यंत भारतातील साखर कारखान्यांना निर्यातीसाठी चांगले दर मिळण्याची शक्यता आहे.

Sugar Export
Sugar Export : उसाचे पैसे वेळेत देण्यासाठी साखर निर्यात वेगाने करावी

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय साखरेला मागणी आहे. अजूनही पाच ते सहा महिन्यांचा कालावधी असल्याने कारखानदारांना याच कालावधीत जास्तीत जास्त निर्यात करून भविष्यातील दर घसरणीचे धोके कमी करता येतील. सध्या कारखानदारांकडे वेळ असल्याने जितकी निर्यात होईल तितका निधीही लवकर उपलब्ध होईल, असे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.

Sugar Export
Sugar Export : साखर निर्यात धोरणामुळे देशातील बंदरांत लगबग वाढली

ब्राझीलमध्ये ३९० लाख टन उत्पादनाचा अंदाज

गेल्या काही वर्षांपासून दुष्काळात होरपळणाऱ्या ब्राझीलने इथेनॉल निर्मितीला प्राधान्य दिले होते; मात्र क्रूड ऑइलच्या तेलाच्या किमतीत कमी-जास्तपणा असल्याने कारखान्यांना इथेनॉलनिर्मिती फारशी फायदेशीर ठरली नाही. यामुळे साखर कारखाने येणाऱ्या हंगामात साखर निर्मितीला प्राधान्य देतील, अशी शक्यता ब्राझीलच्या साखर उद्योगातील संस्थानी व्यक्त केली आहे.

यामुळे ब्राझीलचे साखर उत्पादन ३९० लाख टनांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. या वर्षाच्या तुलनेत साखर उत्पादनात ८ टक्क्यांनी वाढ गृहीत धरण्यात आली आहे. यामुळे ब्राझीलमधून होणाऱ्या निर्यातीत १३ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. ब्राझीलच्या साखरेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ५० लाख टन साखर शिल्लक राहू शकते. नेमकी हीच वाढ भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते. पण ही साखर बाजारात येण्यास एप्रिल उजाडण्याची शक्यता आहे. तोपर्यंत भारतीय साखर कारखानदारांना निर्यातीची मोठी संधी आहे.

महाराष्ट्रातील कारखान्यांना सर्वाधिक समस्या

गेल्या वर्षी ११२ लाख टनांपैकी तब्बल ६५ लाख टन साखर एकट्या महाराष्ट्रातून निर्यात झाली. आता महाराष्ट्राचा २० लाख टनांचा कोटा आणि अदलाबदलीतून मिळणारी पाच लाख टन साखर गृहीत धरली तर दिलेल्या कालावधीत महाराष्ट्राला केवळ २५ लाख टन साखर निर्यात करता येऊ शकते.

गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्के ही साखर महाराष्ट्रातून निर्यात होणार नाही हे निश्‍चित आहे. जर निर्धारित वेळेत इतकी साखरही निर्यात झाली नाही तर त्याचा दबाव शिल्लक साठ्यावर येऊ शकतो. यामुळे स्थानिक बाजारातही ३१०० रुपयांपर्यंत दर पुन्हा घसरू शकतात. मेनंतर पुन्हा निर्यातीची परवानगी मिळाली तरी जागतिक बाजारपेठेत ब्राझीलच्या साखरेचा दबदबा राहील हे निश्‍चित आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com