Soybean Export : नोव्हेंबरमधील ब्राझीलची सोयाबीन निर्यात घटली

ब्राझीलमधून होणारी सोयाबीन आणि सोयापेंड निर्यात नोव्हेंबर महिन्यात ऑक्टोबरच्या तुलनेत घटली होती. मात्र मागील वर्षी नोव्हेंबरमधील झालेल्या निर्यातीपेक्षा जास्त होती, असे ब्राझील कस्टम विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
Soybean Rate
Soybean RateAgrowon

पुणेः ब्राझीलमधून होणारी सोयाबीन आणि सोयापेंड निर्यात (Soybean Export) नोव्हेंबर महिन्यात ऑक्टोबरच्या तुलनेत घटली होती. मात्र मागील वर्षी नोव्हेंबरमधील झालेल्या निर्यातीपेक्षा जास्त होती, असे ब्राझील कस्टम विभागाच्या (Brazil Custom Department) आकडेवारीवरून स्पष्ट होते.

Soybean Rate
Soybean Rate : चीनमधील घडामोडींमुळे सोयाबीनला बळकटी

ब्राझीलमधून होणारी सोयाबीन निर्यात ऑक्टोबरच्या तुलनेत घटली आहे. ऑक्टोबर महिन्यात ४० लाख टन सोयाबीन विविध देशांना निर्यात केली होती. मात्र नोव्हेंबरमधील मका निर्यात २६ लाख टनांपर्यंत कमी झाली.

Soybean Rate
Soybean Rate : चीनमधील घडामोडींमुळे सोयाबीनला बळकटी

पण तरीही मागणीवर्षीच्या याच महिन्यात २५ लाख टनांवर निर्यात स्थिरावली होती. म्हणजेच यंदा गेल्यावर्षीपेक्षा निर्यात २ टक्क्यांनी जास्त झाली. मात्र डिसेंबर महिन्यातील निर्यात २० लाख टनांवरच स्थिरावू शकते, असा अंदाज येथील निर्यातदारांनी व्यक्त केला आहे.

Soybean Rate
Soybean Rate : सोयाबीन दरात वाढ होणार

नोव्हेंबरमध्ये ब्राझीलची सोयापेंड निर्यात घटली आहे. ऑक्टोबरमध्ये १८ लाख टनांवर सोयापेंड निर्यात झाली होती. ती नोव्हेंबरमध्ये १६ लाख टनांपर्यंत कमी झाली. मात्र मागीलवर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत ही निर्यात २३ टक्क्यांनी जास्त होती.

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात १३ लाख टन सोयापेंड निर्यात झाली होती. तर डिसेंबरमधील सोयापेंड निर्यात १५ लाख टनांवर स्थिरावण्याचा अंदाज आहे. नोव्हेंबर महिन्यात ब्राझीलने जवळपास अडीच लाख टन सोयातेल निर्यात केली होती. यंदाच्या नोव्हेंबरमधील सोयातेल निर्यात ३४ टक्क्यांनी जास्त होती. मागीलवर्षी यात महिन्यात ब्राझीलने १ लाख ७९ हजार टन सोयातेल निर्यात केली होती.

मका निर्यातही अधिक

ब्राझीलमधून ऑक्टोबरध्ये ७२ लाख टन मका निर्यात झाली होती. ती नोव्हेंबर महिन्यात ६० लाख टनांपर्यंत घटली. मात्र गेल्यावर्षी याच महिन्यातील मका निर्यात २४ लाक टनांवर होती. म्हणजेच यंदाची नोव्हेंबर महिन्यातील मका निर्यात अडीचपटीने जास्त आहे. तर ब्राझीलच्या ग्रन्स एक्सपोर्ट असोसिएशनच्या अंदाजाप्रमाणे डिसेंबर महिन्यात ५९ लाख टन मका निर्यात होऊ शकतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com