Tur Arrival : तुरीची बंपर आवक, हर्राशीला विलंब

या हंगामात लागवड केलेल्या तुरीची एकाचवेळी बाजारात आवक वाढली आहे. येथील बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आवक झाली असून हर्राशीला विलंब होत असल्याने दोन दिवस नवीन आवक बंद ठेवावी लागली आहे.
Tur Arrival
Tur ArrivalAgrowon

अकोला ः या हंगामात लागवड (Tur Sowing) केलेल्या तुरीची एकाचवेळी बाजारात आवक (Tur Arrival) वाढली आहे. येथील बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आवक झाली असून हर्राशीला विलंब होत असल्याने दोन दिवस नवीन आवक बंद ठेवावी लागली आहे.

बाजार यार्डात सध्या आठ ते नऊ हजार तुरीचे कट्टे असल्याने आधी या मालाची हर्राशी व मोजमाप करण्याची भूमिका बाजार समिती प्रशासनाने घेतली आहे.

Tur Arrival
Tur Import : १० लाख टन तूर आयातीचे भूत

खरीप हंगामात लागवड केलेल्या तुरीच्या पिकाची सर्वत्र काढणी सुरू झालेली आहे. जानेवारीच्या सुरुवातीपासून बाजारात तुरीची आवक सातत्याने वाढत आलेली आहे. गेल्या आठवडाभरात सरासरीत २ हजार पोत्यांची आवक सुरू होती.

परिणामी बाजार समितीच्या यार्डात नवीन तूर ठेवायलाही जागा शिल्लक राहिली नाही. यामुळे बाजार समितीने मंगळवार (ता. २४) पर्यंत नवीन तूर स्वीकारणे बंद ठेवले आहे.

Tur Arrival
Tur Market: तूर ९ हजारांचा टप्पा गाठणार?

तुरीची आवक पाहता त्या तुलनेत हर्राशी वेगाने होऊ शकलेली नाही. पडून असलेल्या तुरीची आधी हर्राशी व मोजमाप करून घेण्याचे काम हातात घेण्यात आले. सोमवारी (ता. २३) बाजार सुरू होताच तुरीची हर्राशी सुरू झाली.

आणखी एक दिवस हर्राशी करून शिल्लक असलेल्या मालाचा निपटारा करणे सुरू झाले. बुधवारपासून पुन्हा नवीन तुरीची आवक सुरू केली जाणार आहे.

दर ७००० पर्यंत ७७५५ रूपये

बाजार समितीत सध्या तुरीची आवक वाढलेली असतानाच दर सुद्धा समाधानकारक मिळत होता. सरासरी सात हजार रुपयांपर्यंत तूर विक्री सुरू होती. शनिवारी तूर किमान सहा हजारांपासून विक्री सुरू झाली.

तर कमाल दर ७७५५ रुपये भेटला. सोमवारी बाजार उघडताच तुरीचा कमाल दर ७२०० पर्यंत खाली आला होता. दरात २०० रुपयांची घट दिसून आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com