Cashewnut Market : काजू बी दरात १० रुपयांनी सुधारणा

हंगामाच्या सुरुवातीला प्रतिकिलो ११५ रुपये काजू बी चा दर होता. परंतु पहिल्या महिनाभरात अपेक्षित उत्पादन न आल्यामुळे काजू बी च्या दरात काहीशी वाढ झाली.
Cashew Processing
Cashew Processing Agrowon

Cashew Market Update सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात काजू बी दरात (Cashewnut Rate) प्रतिकिलो ५ ते १० रुपयांनी सुधारणा झाल्यामुळे जिल्ह्यात सध्या ११० ते ११५ रुपयांनी काजू बी खरेदी सुरू आहे. काजू बीची आवक कमी झाली असल्यामुळे पुढील आठवड्यात दर आणखी सुधारण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात काजू हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. जिल्ह्याच्या काही भागात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून काजू हंगामाला प्रारंभ झाला. हंगामाच्या सुरुवातीला प्रतिकिलो ११५ रुपये काजू बी चा दर होता.

परंतु पहिल्या महिनाभरात अपेक्षित उत्पादन न आल्यामुळे काजू बी च्या दरात काहीशी वाढ झाली. दर आठवड्याला पाच ते दहा रुपयांनी वाढ होत असून काजू बी चे दर १२५ ते १३५ रुपयांवर पोहोचले.

Cashew Processing
Cashew Market : आजऱ्यात काजू बीची आवक थंडावली

१० मार्चनंतर काजू बी ची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे काजू बी च्या दरात घसरण होण्यास सुरुवात झाली. गेल्या आठवड्यापर्यंत हे दर प्रतिकिलो १०० रुपयांपर्यंत आले होते.

दरात मोठी घसरण झाल्यामुळे काजू बागायतदारांमधील अस्वस्थता वाढली. सावंतवाडी-दोडामार्ग फळबागायतदार संघ, वैभववाडी काजू बागायतदार संघ यांनी शासनाकडे गोव्याप्रमाणे १५० रुपये हमीभाव मिळावा मागणी केली.

Cashew Processing
Cashew Market : गोवा सरकार काजू बोंड खरेदीची परवानगी देण्याचे संकेत

काही ठिकाणी आंदोलनेदेखील करण्यात आली. परंतु दरात सुधारणा झाली नव्हती. दरम्यान या आठवड्यात काजू बी ची आवक कमी होऊ लागली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी काजू बी च्या दरात ५ ते १० रुपयांची वाढ केली आहे.

उत्तम दर्जाचा काजुला प्रतिकिलो १५ रुपयेदेखील वाढवून दिले जात आहेत. काजू हंगाम अंतिम टप्प्यात असल्यामुळे पुढील आठवड्यात काजू बी ची आवक अजूनही कमी होणार असल्यामुळे दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com