Cashewnut Rate : आवक वाढल्याने काजूगराच्या दरात घट

ऐन शिमगोत्सवात काजूगराला खवय्यांकडून मागणी वाढत आहे. माणगाव तालुक्यातील बाजारपेठेत काजूगराची आवक वाढल्याने काजूगराच्या दरात घसरण झाली आहे.
Cashew Rate
Cashew Rate Agrowon

Cashew Market माणगाव : ऐन शिमगोत्सवात (Shimga Festival) काजूगराला खवय्यांकडून मागणी (Cashewnut Demand) दरात (Cashewnut Rate) घसरण झाली आहे. त्यामुळे काजूगर खरेदीसाठी खवय्यांनी गर्दी केली आहे.

रानमेव्यासाठी प्रसिद्ध असलेली माणगाव तालुक्यातील बाजारपेठ ओल्या काजूच्या विक्रीचे एक केंद्र बनत आहे.आजूबाजूच्या डोंगरातील वस्तीवरून विक्रीस येणाऱ्या आदिवासी महिलांना रोजीरोटीचे चांगले साधन यानिमित्ताने उपलब्ध झाले आहे.

Cashew Rate
Cashew Processing : काजू प्रक्रिया उद्योजकांच्या थकित कर्जाची पुनर्रचना

शेकडा १५० ते २०० रुपयांना मिळणारे काजूगर गेल्या काही दिवसांत आवक वाढल्याने १०० ते १२० रुपयांनी विक्री होत आहेत. यामुळे खवय्ये व पर्यटकांनीही काजू खरेदीला पसंती दिली आहे. ऐन सणासुदीत काजूगराची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे.

Cashew Rate
Cashew Rate : काजू बीला किती मिळतोय दर?

या दिवसात मिळणारे काजूगर अत्यंत चविष्ट असतात. दरवर्षी आम्ही हमखास काजूगर नेतो. आता हंगाम सुरू झाला असून, काजूगर स्वस्त झाले आहेत.

- बाळाराम मांडवकर, काजूगरप्रेमी

सुरुवातीला काजूगर काहीसे महाग होते. आता रानातून बऱ्यापैकी काजूगर मिळू लागल्याने थोडे स्वस्त झाले आहेत. काही दिवसांपासून १५० ते २०० रुपयांना विकले जाणारे काजूगर १२० रुपयांपासून पुढे विकले जात आहेत.

- मंजुळा जाधव, काजूगर विक्रेता

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com