Sugar Export : केंद्राची ७.७७ लाख टन साखर निर्यातीस परवानगी

साखर उद्योगाकडून सातत्याने साखर निर्यातीला परवानगी देण्याची मागणी होत आहे. त्यामुळे केंद्राने ७. ७७ लाख टन साखरेला निर्यातीची परवानगी दिली आहे.
Sugar Export
Sugar ExportAgrowon

कोल्हापूर : साखर उद्योगाकडून (Sugar Industry) सातत्याने साखर निर्यातीला (Sugar Export) परवानगी देण्याची मागणी होत आहे. त्यामुळे केंद्राने ७. ७७ लाख टन साखरेला निर्यातीची परवानगी (Permission To Sugar Export) दिली आहे. शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी या बाबतचे नोटिफिकेशन काढण्यात आले.

Sugar Export
Sugar : निर्यात नोटिफिकेशनच्या प्रतीक्षेत साखर कारखाने

निर्यातदार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने ७.७७ लाख टन साखरेस परवानगी देण्यात आल्याची रिलीज ऑर्डर काढली आहे. जूनमध्ये एकूण मागणीच्या ४८ टक्के साखरेसच परवानगी दिली होती. मागणीच्या ५२ टक्के साखर परवानगीशिवाय प्रलंबित होती. त्याच साखरेस आता परवानगी देण्यात आली आहे. ७.७७ पैकी प्रत्यक्ष कारखान्यांना ४ लाख ६० हजार टन साखर निर्यात करता येऊ शकेल. फक्त श्रीलंकेसाठी ६० हजार टन निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित परवानगी ही बंदरावर पडून असलेल्या साखरेसाठी आहे. या परवानगीने सध्या तरी कोणतेही नवीन कंत्राट होणार नाही, अशी शक्यता असल्याचे निर्यातदारांकडून सांगण्यात आले.

Sugar Export
Sugar : जुलैची देशांतर्गत साखर विक्रीस एक महिन्याची मुदतवाढ

केंद्राने नव्याने साखर निर्यातीस परवानगी दिली असली तरी अजूनही केंद्र खुल्या मनाने मोठ्या प्रमाणात साखर निर्यातीला परवानगी देत नसल्याचे चित्र असल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले. या रिलीज ऑर्डरमुळे झालेल्या करारातील काही साखर बाहेर जाऊ शकेल. मात्र नव्याने करार करताना पुन्हा परवानगीचीच गरज असेल. गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १२ लाख टन साखरेस परवानगी देण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र प्रत्यक्षात साडेसात लाख टन साखर निर्यातीचीच परवानगी मिळाली आहे.

Sugar Export
Sugar : साखरेच्या ‘एमएसपी’त वाढ करा ः इस्मा
जूनमध्ये साखर उद्योगाने साखर निर्यातीची परवानगी मागितली होती. मागणीच्या तुलनेत केवळ ४८ टक्के परवानगी त्यावेळी देण्यात आली. मागणीतीलच शिल्लक ५२ टक्के साखरेस या रिलीज ऑर्डरने परवानगी देण्यात आली आहे.
अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार.

...अशी असेल परवानगी (टनांत)

करार केलेली साखर...४ लाख ३०,हजार५६३

बंदरावरील साखर...२ लाख २४ हजार ९८९

रेणुका रिफायनर...५८ हजार ६०५

फार्मा ग्रेड...२०२६

श्रीलंका...६०६१४

एकूण...७ लाख ७७ हजार ७९७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com