Tur Market Rate : तूर आयातीवरील शुल्क सरकारने काढले

देशात सध्या तुरीचे दर तेजीत आहेत. शेतकरी तुरीची विक्री मर्यादित करत आहेत. पण तुरीला चांगला उठाव असल्याने ऐन हंगामात दर कमी होताना दिसत नाही.
Tur Market
Tur MarketAgrowon

Tur Market Update पुणे ः देशात सध्या तुरीचे दर (Tur Rate) तेजीत आहेत. शेतकरी तुरीची विक्री मर्यादित करत आहेत. पण तुरीला चांगला उठाव असल्याने ऐन हंगामात दर कमी होताना दिसत नाही. त्यामुळे सरकारने तूर आयातीवरील (Tur Import) १० टक्के शुल्क काढण्याचा निर्णय घेतला.

पण सरकारने आधीच मुक्त आयात धोरणाचा (Import Policy) अवलंब केला आहे. त्यामुळे आयात शुल्क काढल्याचा तुरीच्या दरावर परिणाम होणार नाही, असे अभ्यासकांनी सांगितले.

देशात यंदा तुरीची लागवड कमी झाली. त्यातच पावसाचा आणि बदलत्या वातावरणाचा फटका तूर पिकाला बसला.

त्यामुळे तूर उत्पादन घटणार हे स्पष्ट झाले होते. उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आल्याने स्टॉकिस्टनी तुरीची मर्यादित विक्री सुरू ठेवली.

परिणामी, बाजारात तुरीचे दर तेजीत आले. दुसरीकडे सरकारनेही तुरीचे दर कमी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या.

सरकारने मुक्त तूर आयातीचे धोरण राबवले. या धोरणाला एक वर्षाची मुदतवाढही दिली. तसेच आयात तूर खेरदीही केली.

Tur Market
Tur Market Rate : खानदेशात तुरीला ७५०० रुपयांपर्यंत दर

शेतकऱ्यांची तूर हाती आल्यानंतर भाव नरमतील, अशी आशा सरकारला होती. पण बाजारातील तेजी पाहून शेतकऱ्यांनी तुरीची मर्यादित विक्री सुरू ठेवली. सध्या देशातील तूर काढणी वेगाने सुरू आहे. काही भागात तूर काढणी पूर्णही झाली.

पण बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. परिणामी तुरीचे दर तेजीत आहेत. तसेच पुढील काळात तुरीच्या दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Tur Market
Tur Market : तूर यंदा ९ हजारांचा टप्पा गाठेल का?

म्यानमारमधून आयात सुरू

तुरीचे दर कमी होत नाही म्हटल्यावर सरकारने ३ मार्च रोजी तुरीच्या आयातीवरील शुल्क १० टक्क्यांवरून शून्य केले. पण सरकारने याधीच मुक्त तूर आयात धोरण सुरू ठेवलेय. त्यामुळे या निर्णयाचा बाजारावर परिणाम जाणवणार नाही.

कारण आफ्रिकेतील तूर आता संपत आली. म्यानमारमधून तूर आयात सुरू आहे. पण यंदा आयात वाढली तरी देशातील उत्पादन कमी असल्याने दरावर दबाव येण्याची शक्यता कमीच आहे.

दहा लाख टन आयातीचे उद्दिष्ट

सरकारने यंदा १० लाख टन तूर आयातीचे उद्दिष्ट ठेवले. पण आंतरराष्ट्रीय बाजारात १० लाख टनांपेक्षा जास्त तूर उपलब्ध नसते. भारताला सर्व तूर आयात करता येणार नाही.

त्यामुळे यंदा ८ लाख १० हजार टनांपेक्षा जास्त तूर आयात होण्याची शक्यता कमीच आहे. कारण आफ्रिका आणि म्यानमारमध्ये आता जास्त तूर शिल्लक नाही.

तुटवड्यामुळे दरातील तेजी टिकेल

सरकारने आयात शुल्क काढले तरी त्याचा परिणाम तुरीच्या दरावर होणार नाही. सध्या तुरीला बाजारात ७ हजार ५०० ते ८ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. देशातील तुरीचा तुटवडा बघता तुरीचे दर पुढील काळातही तेजीत राहू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com