Cotton: कापसाची गुणवत्ता, ब्रॅंडिंगवर केंद्र सरकारचा भर

भारतातून निर्यात होणाऱ्या कापसाची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकार प्रयोगशाळांची उभारणी करण्याच्या तयारीत आहे. तसेच शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
Cotton Cultivation
Cotton CultivationAgrowon

भारतातून निर्यात होणाऱ्या कापसाची गुणवत्ता (Quality Of Export Cotton) सुधारण्यासाठी केंद्र सरकार प्रयोगशाळांची उभारणी करण्याच्या तयारीत आहे. तसेच शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे (Cotton Seed) वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. देशातील कापूस निर्यात (Cotton Export) २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दीष्ट सरकारने ठेवले आहे.

कृषी आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाने नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती. कापसाची उत्पादकता वाढवणे, भारतीय कापसाचे ब्रँडिंग करणे आदी मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय वस्त्रोद्योग आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्यासह कापड उद्योगातील मान्यवर उपस्थित होते.

Cotton Cultivation
Cotton: कापूस उत्पादकांना सरकारचा कोरडा उपदेश

भारताचे जागतिक कापूस बाजारातील स्थान उंचावण्यासाठी एकात्मिक आणि उद्योगकेंद्री दृष्टिकोन स्वीकारण्याची वेळ आली आहे, असे मत कॉटन टेक्सटाईल एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे चेअरमन मनोज पटोदिया यांनी व्यक्त केले. त्या अनुषंगाने कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारीचे प्रकल्प राबवणे, कॉर्पस फंडच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाचा अंगीकार करणे, सघन कापूस लागवडीला प्रोत्साहन देणे आणि भारतीय कापसाचे ब्रॅँडिंग करण्यासाठी ठोस पावले उचलणे ही काळाजी गरज आहे, असे पटोदिया म्हणाले. ‘फार्म टू फॅशन' या संपूर्ण वस्त्रोद्योग मूल्यसाखळीसाठी या उपायांचा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.

Cotton Cultivation
राज्यभर Soybean, Cotton, कडधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान | ॲग्रोवन

केंद्र सरकारने मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली आहे. कृषी आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाने उद्योगांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे निर्यात वाढवण्यासाठी मदत होईल, असे पटोदिया म्हणाले.

शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या मुद्यावरही या बैठकीत चर्चा झाली. सघन कापूस लागवड तंत्राचे प्रशिक्षण देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. तसेच कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) कापसाची गुणवत्ता सुधारणे आणि ब्रॅंडिंगसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात रस दाखवला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com