Chana Market
Chana Market Agrowon

Chana Market : जूनपासून हरभरा आवक कमी होणार?

Chana Market Rate देशातील बाजारात सध्या हरभरा भाव दबावात आहेत. नाफेडची खेरदी सुरु असल्याने बाजारातील हरभरा आवक कमीच दिसते. नाफेडची खरेदीही जोमात सुरु आहे.

Chana Bajarbhav : देशातील बाजारात सध्या हरभरा भाव दबावात आहेत. नाफेडची खेरदी सुरु असल्याने बाजारातील हरभरा आवक कमीच दिसते. नाफेडची खरेदीही जोमात सुरु आहे. नाफेडच्या खरेदीत महाराष्ट्राला मागं सोडत मध्य प्रदेश अव्वल ठरला.

देशातील बाजारात हंगामाच्या सुरुवातीपासूनच हरभरा भाव दबावात आहेत. हरभऱ्याची सरासरी दरपातळी ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. तर सरकारने यंदा हरभऱ्याला प्रतिक्विंटल ५ हजार ३३५ रुपयांचा हमीभाव जाहीर केला.

सध्या हरभऱ्याला सरासरी किमान ५०० रुपयांचा कमी भाव मिळतोय. नाफेडची खरेदीही जोमात सुरु आहे. तरीही खुल्या बाजाराला आधार मिळत नाही. तसं पाहिलं तर सध्या लग्न आणि समारंभांचा काळ आहे. या काळात हरभरा डाळीला चांगला उठाव असतो. पण तरीही हरभरा भाव दबावात आहेत.

मागील आठवड्यात हरभरा बाजारात सामान्य स्थिती राहीली. नाफेडची खरेदी आजही जोमात सुरु आहे. ताज्या आकडेवारीनुसार नाफेडने देशभरात आतापर्यंत १९ लाख टनांची खरेदी केली.

Chana Market
Chana market: हरभऱ्याचा बाजार दबावातच का आहे?

तर दुसरीकडे सरकारच्या दबावामुळे उद्योगांकडून गरजेप्रमाणे खरेदी सुरु आहे. यामुळे बाजारात हरभरा दरात सुधारणा दिसत नाही. हरभरा दरपातळी एकाच टप्प्यावर स्थिर दिसतात.

त्यामुळे शेतकरी नाफेडच्या खेरदीलाच प्राधान्य देताना दिसतात. जास्तीत जास्त हरभरा सध्या नाफेडलाच मिळतोय. तर खुल्या बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच दिसते.

Chana Market
Chana Procurement : हमीभावातील हरभरा खरेदीचे उद्दिष्ट वाढले

नाफेडच्या खेरदीमध्ये तीन आठवड्यापुर्वी महाराष्ट्र अव्वल होता. या काळात मध्य प्रदेशातील खुल्या बाजारात हरभरा आवक अधिक होती. पण मध्य प्रदेशात अचानक हरभरा खरेदी वाढली.

मोठे शेतकरी विदर्भातून कमी दरात हरभरा खरेदी करून मध्य प्रदेशात हमीभावाने विकत असल्याचे काही व्यापारी आणि जाणकारांनी सांगितले. त्यामुळेच नाफेडची खरेदी सुरुवातीला धीम्या गतीने सुरु होती आणि नंतरच्या टप्प्यात वेगाने वाढली.

यंदा महाराष्ट्र आणि शेजारच्या राज्यांमध्ये लागवड जास्त होती. खुल्या बाजारातील दर दबावात असल्याने नाफेडला हरभरा मिळत आहे.

पण अनेक संस्था आणि जाणकारांच्या मते देशातील उत्पादन कमी आहे. जून महिन्यापासून बाजारातील हरभरा आवक कमी होत जाईल. त्यामुळे मिलर्सना नाफेडकडूनच हरभरा खेरदी करावा लागेल.

बाजाराचा विचार करता फंडामेंटल्स (मुलभूत घटक) हरभरा बाजाराला आधार देणारे आहेत. पण सरकारकडे हरभऱ्याचा मोठा स्टाॅक आहे. उद्योगांना हा स्टाॅक नंतरच्या काळात मिळेल. याचा दबाव सध्या बाजारावर आहे, असे जाणकारांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com