Tur Market : यंदा १० लाख टन तूर आयातीसाठी धोरणात बदल : केंद्रीय सचिव

देशात यंदा तुरीची लागवड कमी झाली. तसंच पाऊस आणि मररोगामुळं देशातील उत्पादन घटणार हे सिध्द झालं होतं.
Tur Market
Tur MarketAgrowon

पुणेः देशातील तूर उत्पादन (Tur Production) यंदा मोठ्या प्रमाणात घटलं. दरवाढ कमी करण्यासाठी सरकार आयातीला प्रोत्साहन देत आहे. सराकरनं आयात (Import) वाढविण्यासाठी धोरणंतही बदल केला.

त्यामुळे यंदा देशात १० लाख टन तूर आयात (Tur Import) होऊ शकते, असा अंदाज केंद्रीय ग्राहक कल्याण विभागाचे (Central Consumer Welfare Department) सचिव रोहीत कुमार सिंह यांनी सांगितलं.

देशात यंदा तुरीची लागवड (Tur Cultivation) कमी झाली. तसंच पाऊस आणि मररोगामुळं देशातील उत्पादन घटणार हे सिध्द झालं होतं. त्यामुळं स्टाॅकिस्ट आणि व्यापाऱ्यांनी तुरीचा साठा (Tur Stock) रोखून धरला.

बाजारातील आवक कमी होऊन दर तेजीत आले. तूर दरातील तेजी पाहून सरकारने आयातीला प्रोत्साहन दिले. यंदा सरकार विक्रमी तूर आयात करणार आहे. 

केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्रालयाचे सचिव रोहीत कुमार सिंह यांनी देशातील तूर उत्पादन घटल्याचं सांगितलं. देशात यंदा तूर पिकावर मर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला.

त्यामुळे भारतात यंदा १० लाख टन आयात करण्याची शक्यता आहे, असंही सिंह यांनी सांगितलं. 

मागील हंगामात भारतानं ७ लाख ६० हजार टन तूर आयात केली होती. तर यंदा विक्रमी आयात होण्याची शक्यता आहे. यंदा देशात १० लाख टन तूर आयात करण्याची शक्यता आहे, असंही सिंह यांनी सांगितलं. 

Tur Market
Tur Market: तूर उत्पादन ३० लाख टनांवरच स्थिरावणार?

आयातीसाठी धोरणात बदल

भारताला प्रामुख्यानं पूर्व आफ्रिकेतील देश आणि म्यानमार देशातून तूर आयात होते. या देशांमधून प्रामुख्यानं ११ ते १२ लाख टन तूर निर्यात होते.

त्यापैकी १० लाख टन तूर भारतात येऊ शकते. देशात तुरीची आयात वाढावी यासाठी सरकारने आयात धोरणामध्ये काही सुधारणा केल्या आहेत. यामुळे देशात तूर आयातीला प्रोत्साहन मिळू शकते, असंही सिंह यांनी सांगितलं. 

राज्यातील उत्पादनात मोठी घट

मर रोगाचा प्रादुर्भाव कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये झाला. त्यामुळं यंदा देशातील तूर उत्पादन १० ते १२ टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक ही तूर उत्पादनातील महत्वाची राज्ये आहेत. त्यामुळं देशातील उत्पादनावर लगेच परिणाम होऊ शकतो, असं उद्योगांनी सांगितलं. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com