Politics : खोके, पेट्या ः दर्या में खसखस

सत्ताबदल झाल्यानंतर आर्थिक धोरणात कोणते बदल झाले, कोणते प्रकल्प स्थगित झाले, कोणते स्थगित झालेले प्रकल्प पुनरुज्जीवित झाले याची यादी बनवली तर डोळ्यांना सहज न दिसणाऱ्या देशाच्या साधनसामग्री आणि संपत्तीच्या भूगर्भातील टेक्नोटिक प्लेट्स कशा हलत आहेत, हे कळायला मदत होईल.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsAgrowon

सत्तेचा रक्तरंजित खेळ सामान्य नागरिक डोळे विस्फारून, श्‍वास रोखून बघतात, ऐकतात. हा सत्तेचा खेळ सत्ताकांक्षी व्यक्ती खेळतात. साहजिकच या खेळाच्या चर्चा व्यक्तींभोवती फिरत राहतात. नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी (Narendra Modi Rahul Gandhi), एकनाथ शिंदे वि. उद्धव ठाकरे (Eknath Shinde Udhhav Thackeray), नितीश, तेजस्वी, ममता, स्टालिन इत्यादी व्यक्ती चर्चेत राहतात. पण राजकीय सत्ताबदलामुळे देशातील, राज्यातील आर्थिक / वर्गीय समीकरणे देखील अतिशय सूक्ष्मपणे, कोणताही आवाज न करता बदलत असतात. आपल्याला वाटते तसे सत्ताबदल ‘एन्ड इन इटसेल्फ’ नसते.

राजकीय सत्ता आणि आर्थिक/ वर्गीय सत्ता एकत्रच बघावयास हव्यात. त्यामुळे विशिष्ट राजकीय अर्थव्यवस्था आकाराला येत असते, असलेल्या आकारात बदल होतात, विशिष्ट कॉर्पोरेट आर्थिक हितसंबंधी गट पकड घेतात इत्यादी.

Maharashtra Politics
Soybean Crop Damage : पावसाचे पुनरागमन सोयाबीनसाठी मारक

सत्ताबदल झाल्यानंतर आर्थिक धोरणात कोणते बदल झाले, कोणते प्रकल्प स्थगित झाले, कोणते स्थगित झालेले प्रकल्प पुनरुज्जीवित झाले याची यादी बनवली तर डोळ्यांना सहज न दिसणाऱ्या देशाच्या साधनसामग्री आणि संपत्तीच्या भूगर्भातील टेक्नोटिक प्लेट्स कशा हलत आहेत, हे कळायला मदत होईल. त्यासाठी जमीन, जल, जंगल, नैसर्गिक साधनसामग्री, अर्थसंकल्पातून दिली जाणारी वित्तीय साधनसामग्री आणि मुख्य म्हणजे अर्थव्यवस्थांना नियमित करणारे कायदे आणि धोरणे यात केले जाणारे बदल यांचा अभ्यास केला पाहिजे.

Maharashtra Politics
Soybean Harvesting : सोयाबीन कापणीवर पावसाचं सावट ?

उदा. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मीडियात पानभर जाहिराती देऊन दिवाळीला १०० रुपयांत फराळाच्या वस्तू वगैरे योजना बाजूला ठेवा, त्यात फक्त पॉलिटिकली करेक्ट टोकनिझम असतो आणि त्यात दिली जाणारी साधनसामग्री चवन्नी एवढी असते. डोळ्यांना सहज दिसणाऱ्या गोष्टींच्या याद्या बनवल्या पाहिजेत, त्यातील पॅटर्न हुडकून काढला पाहिजे. उदा. खालील प्रकल्पांवर नजर टाका.

समृद्धी महामार्ग, मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन पार गुजरात सीमेपर्यंत वाढवणे, मुंबई किनारा/ कोस्टल मार्ग, मुंबई- पोरबंदर मार्ग. सगळ्या प्रकल्पांत मुंबई केंद्रस्थानी. जणू काही महाराष्ट्र्र राज्य संकोचून मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनपुरते मर्यादित झाले आहे आणि उर्वरित महाराष्ट्र हा मुंबईचे ॲनेक्शचर आहे.

हे सगळे भांडवलसघन प्रकल्प आहेत; ज्यात भांडवल रिचवून घेण्याची क्षमता आहे; ज्यात भारतीय आणि जागतिक कॉर्पोरेट भांडवलाला रस आहे. घरात जमलेली नाणीदेखील अधूनमधून मोजत बसणारी, आयुष्यात मोठ्या नोटा न बघणारी, एक कोटी म्हणजे एकावर नक्की किती शून्ये हे देखील सांगता न येणारी कोट्यवधी प्रौढ माणसे रक्तरंजित सत्तेच्या खेळात देवाण-घेवाण होणाऱ्या खोके / पेट्या वगैरे शब्दांनी दिपून जातात.

ते मिळणाऱ्यांबद्दल एक प्रकराची असूया बाळगतात. पण राज्य/ देश/ जगात जे मिलियन्स/बिलियन्स/ ट्रिलियन्समधील आर्थिक व्यवहार होतात, त्यांच्या तुलनेत हे खोके/ पेट्या म्हणजे दर्यामें खसखस असते. हे सामान्य नागरिकांना नाहीच पण खोके/ पेट्या मिळणाऱ्या सत्तापटुंनादेखील माहीत नसते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com