चीनने अमेरिकेतून शेतीमाल आयात वाढवली

मागीलवर्षी शेवटच्या काळात वाढलेल्या किमती, घटलेला आर्थिक विकास दर आणि पशुखाद्य उद्योगातून कमी झालेली मागणी, यामुळं चीनने अमेरिकेतून शेतीमालाची आयात कमी केली होती.
Agriculture Import
Agriculture ImportAgrowon

पुणेः मागीलवर्षी शेवटच्या काळात वाढलेल्या किमती, घटलेला आर्थिक विकास दर आणि पशुखाद्य उद्योगातून (Animal Feed Industry) कमी झालेली मागणी, यामुळं चीनने अमेरिकेतून शेतीमालाची आयात (Agriculture Import) कमी केली होती. मात्र २०२२ च्या पहिल्या सहा महिन्यांत चीनने अमेरिकेतून शेतीमाल आयात गेल्यावर्षीपेक्षा १५ टक्क्यांनी अधिक केली.

Agriculture Import
China US War : चीन-अमेरिकेची युध्दखोरी शेतकऱ्यांच्या मुळावर?

तैवानच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि चीन (US China Conflict) यांच्यात तणाव वाढला. या दोन देशांमधील संबंध बिघडू शकतात, तसंच चीन आक्रमक भुमिका घेऊन अमेरिकेसोबातचा व्यापार थांबवून कोंडी करेल, असा अंदाज वर्तविला जातोय. मात्र शेतीमालाच्या बाबतीत चीन अमेरिकेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. चीन सलग तिसऱ्या वर्षी अमेरिकेच्या शेतीमालाचा सर्वांत मोठा आयातदार ठरण्याची शक्यता आहे. चीनने यंदाच्या पहिल्या सहा महिन्यांत अमेरिकेतून गेल्यावर्षीपेक्षा अधिक आयात केली. यंदा अमेरिकेतून १७५० कोटी डाॅलरची शेतीमाल आयात चीनने केली. जी गेल्यावर्षीपेक्षा १५ टक्क्यांनी अधिक आहे. यात मांस आयात वाढली. मात्र शेतीमालाच्या किमती वाढल्यानेही यंदा आयातीचं मूल्य वाढल्याचं दिसत आहे.

Agriculture Import
Fertilizer : विक्रेत्यांना मिळणार दुकान पोहोच खत

चीनची सहा महिन्यांतील आयात ही २०१८ आणि २०१९ मधील पूर्ण वर्षातील आय़ातीपेक्षा अधिक आहे. चीनने अमेरिकेतून केलेल्या या आयातीत २९ टक्के वाटा सोयाबीनचा आहे. त्यानंतर मका १८ टक्के, कापूस ११ टक्के आणि ज्वारीचा ९ टक्के वाटा आहे. मागीलवर्षी शेतीमालाचे दर वाढलेले होतेच. मात्र यंदा मक्याचा दर गेल्यावर्षीपेक्षा २१ टक्क्यांनी जास्त होता. तर सोयाबीन २३ टक्क्यांनी महागलं होतं. तर कापसाच्या दरात ३४ टक्क्यांची वाढ झालेली होती.

यंदा पहिल्या सहा महिन्यांमध्ये चीनने अमेरिकेतून ९७ लाख टन मक्याची आयात केली. मात्र मक्याची आयात गेल्यावर्षीपेक्षा २४ टक्क्यांनी कमी राहिली. तर सोयाबीनची आयात १५ टक्क्यांनी वाढली. चीनने यंदा ८८ लाख टन सोयाबीन अमेरिकेतून आयात केलं. तसंच कापसाची आयात तब्बल ७७ टक्क्यांनी अधिक झाली. ८ लाख टन कापूस यंदा चीननं अमेरिकेतून खरेदी केला.

मागील वर्षी शेवटच्या टप्प्यात शेतीमालाचे दर वाढले होते. तसचं चीनच्या पशुखाद्य उद्योगातून मागणी कमी झाली होती. यातच आर्थिक विकासही मंदावला. त्यामुळं २०२१ च्या शेवटी चीननं शेतीमाल आयात कमी केली होती. मात्र २०२२ मध्ये पुन्हा आयात वाढवली. जागतिक शेतीमाल बाजारात सध्या टंचाई जाणवतेय. दर वाढले तरी अमेरिकेत शेतीमाल उपलब्ध होतोय. त्यामुळं चीन अमेरिकेतून आयात सुरुच ठेवेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com