Fertilizer : चीन यंदा ७० लाख टन पोटॅश आयात करणार

जागतिक बाजारात आधीच खतांच्या किमती वाढल्या आहेत. चीनच्या मागणीमुळे खत बाजारपेठेवर आणखी परिणाम होऊ शकतो, असे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले.
Fertilizer
FertilizerAgrowon

पुणेः जागतिक पातळीवर पोटॅश खतांचा वापर (Use Of Potash Fertilizer) गेल्या काही वर्षांत वाढत आहे. चीन पोटॅश उत्पादनात (Potash Production) चौथ्या क्रमांकावर आहे. पण जगात पोटॅशचा सगळ्यात जास्त वापर चीनमध्ये (China's Potash Consumption) होतो. चालू हंगामात चीन ७० लाख टन पोटॅश आयात (Potash Import) करण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात आधीच खतांच्या किमती (Fertilizer Rate) वाढल्या आहेत. चीनच्या मागणीमुळे खत बाजारपेठेवर (Fertilizer Rate) आणखी परिणाम होऊ शकतो, असे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले.

जागतिक बाजारात २०२१ मध्ये खतांचे दर जवळपास ८० टक्क्यांनी वाढले होते. त्यानंतर २०२२ मध्ये खतांच्या किंमतीत ३० टक्के वाढ झाली. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, रशिया आणि बेलारुसमधून होणाऱ्या पुरवठ्यातील अडचणी आणि उत्पादक देशांनी निर्यातीवर घातलेली बंधने, यामुळे खते महागली.

Fertilizer
Fertilizer : रासायनिक कंपन्यांनी सेंद्रिय खते पुरवावीत

जगात वर्षागणिक पोटॅश खतांचा वापर वाढत आहे. युएस जीऑलाॅजीकल सर्वेने दिलेल्या अहवालात २०२० मध्ये जगतिक पोटॅशचा वापर ४४० लाख टन झाल्याचं म्हटलंय. तर २०२१ मधील वापर ४५० लाख टनांवर पोचला. चालू वर्षी त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा सुरुवातीपासूनच जगातील विविध देशांकडून पोटॅशला मागणी वाढली. आशिया आणि दक्षिण अमेरिका खंडात पोटॅशचा सर्वाधिक वापर होतो. तर उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि आग्नेय आशियातूनही पोटॅशला मागणी वाढतेय. २०२० नंतर या भागातून मागणीने उचल खाल्ली.

Fertilizer
Fertilizer Price Hike: खते महागल्यामुळे भात लागवड घटली?

एकिकडे पोटॅशची मागणी वाढत असताना उत्पादनही वाढण्याची शक्यता आहे. युएस जीऑलाॅजीकल सर्वेच्या मते जगातिक पोटॅश उत्पादन २०२१ मध्ये ६२३ लाख टनांवर होते. ते २०२५ मध्ये ६९० लाख टनांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. यात एमओपी खतांचे उत्पादन जास्त वाढण्याची शक्यता आहे. कॅनडा, रशिया आणि बेलारूस हे देश एमओपी उत्पादनात आघाडीवर आहेत. या देशांमध्ये पोटॅशच्या नवीन खाणींवर काम सुरु आहे. तसेच काही प्रकल्पांचा विस्तारही केला जात आहे.

जगात पोटॅश उत्पादनात कॅनडा, रशिया आणि बेलारुसनंतर चीनचा क्रमांक लागतो. कॅनडात दरवर्षी १४० लाख टन पोटॅशचे उत्पादन होते. तर रशियात ९० लाख टन आणि बेलारुसमध्ये ८० लाख टन पोटॅशचे उत्पादन होते. तर चीन दरवर्षी ५० ते ६० लाख टन उत्पादन घेतो. चालू वर्षात चीनचं पोटॅश उत्पादन ५५ लाख टनांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. चीनमध्ये २०१६ पासून उत्पादन स्थिर आहे.

चीन पोटॅश उत्पादनात चौथ्या क्रमांवर असला तरी वापरात मात्र अव्वल आहे. जगातील एकूण पोटॅश वापरात एकट्या चीनचा वाटा तब्बल २० टक्के आहे. चीनमधील शेतीपध्दतीत पोटॅशचा वापर अत्यावश्यक मानला जातो. त्यामुळे चीनला दरवर्षी साधारणपणे १३० लाख टन पोटॅशची गरज असते. परंतु उत्पादन कमी आहे. त्यामुळे आयात केली जाते. चीन यंदा जवळपास ७० लाख टन पोटॅश आयात करण्याची शक्यता आहे. यात एमओपीचा समावेश जास्त असेल. रशिया आणि बेलारुस हे चीनला पोटॅशचा पुरवठा करणारे महत्वाचे देश आहेत.

जगात २०२१ पासून पोटॅशच्या किमती वाढलेल्या आहेत. पोटॅशचा पुरवठा जागतिक बाजारात कमी आहे. आता चीन ७० लाख टन आयात करणार म्हणजेच पोटॅशला मागणी वाढेल. परिणामी दरात आणखी वाढ होऊ शकते, अशी शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com