Capsicum Market : कळमना बाजारात ढोबळी मिरची तेजीत

कळमना बाजार समितीत वाळलेल्या मिरचीनंतर आता ढोबळी मिरची दरातही तेजी अनुभवी जात आहे.
Market Committee
Market CommitteeAgrowon

नागपूर : कळमना बाजार समितीत (Kalamana APMC) वाळलेल्या मिरचीनंतर आता ढोबळी मिरची दरातही (Capsicum Rate) तेजी अनुभवी जात आहे. ढोबळ्या मिरचीचे दर (Capsicum Market Rate) गेल्या आठवड्यात १५०० ते १७०० याप्रमाणे होते. ३०० क्विंटलची आवक नोंदविली गेली. आता मात्र आवक कमी झाल्याने दरात तेजी अनुभवली जात आहे. २५०० ते ३००० रुपये क्विंटलवर या मिरचीचे दर पोहोचल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

Market Committee
Market Committee Election : शेतकऱ्यांना उमेदवारी कोणत्या गटातून?

कळमना बाजार समितीत मिरची दर चांगलेच तेजीत आले आहेत. १२००० ते २०००० रुपये प्रमाणे वाळलेल्या मिरचीचे व्यवहार होत आहेत. गेल्या आठवड्यात वाळलेल्या मिरचीची आवक ३३३ क्विंटल होती. या आठवड्यात ही आवक दुपटीने वाढत ६१४ क्विंटलवर पोहोचल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यानंतरही वाळलेल्या मिरचीचे दर स्थिर आहेत. ढोबळी मिरची गेल्या आठवड्यात १५०० ते १७०० अशी होती.

या आठवड्यात २५०० ते ३००० रुपयांनी ढोबळ्या मिरचीचे व्यवहार होत आहेत. आवक कमी झाल्याच्या परिणामी मिरचीच्या दरात तेजी अनुभवी जात असल्याचे सांगण्यात आले. हिरव्या मिरचीची आवक गेल्या आठवड्यात ३०० क्विंटल होती. १५०० ते १८०० असा दर होता. या आठवड्यात आवक २६० क्विंटलवर पोहोचली. १५०० ते २००० रुपयांनी हिरव्या मिरचीचे व्यवहार होत आहेत. बाजारात कोथिंबीरची आवक गेल्या आठवड्यात ३५० क्विंटल अशी होती. २००० ते ४००० रुपये असा दर होता.

या आठवड्यात आवक तीनशे क्विंटल तर दर ३००० ते ४००० रुपयांवर पोहोचले. दुधी भोपळ्याची आवक गेल्या आठवड्यात ३५० क्विंटल तर या आठवड्यात अवघी १२ क्विंटल झाली. त्यामुळे दरातही तेजी आली आहे. गेल्या आठवड्यात ४०० ते ६०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे दुधी भोपळ्याचे व्यवहार झाले. या आठवड्यात ते ३००० ते ४००० रुपयांवर पोहोचले. बाजारात कारलीची आवक ७० क्विंटल इतकी आहे.

Market Committee
Chili Market : पावसामुळे यंदा लाल मिरचीचे भाव वधारले

२००० ते २५०० असे दर गेल्या आठवड्यात कारलीला होते. या आठवड्यात ३००० ते ३५०० प्रमाणे कारलीचे व्यवहार झाले. मध्यंतरी फ्लावर (फुलकोबी) ची आवक अवघी १५ क्विंटलवर आली होती. त्यावेळी दर चांगलेच वधारत १००० ते १५०० क्विंटल प्रमाणे फ्लॉवरचे व्यवहार झाले. आता आवक वाढल्याने ३०० ते ५०० असा दर मिळत आहे. बाजारातील पत्ताकोबीची आवक ८०० क्विंटल वर पोहोचली आहे. २०० ते ५०० रुपये प्रमाणे याला दर मिळत होता. काकडीची आवक १५० क्विंटल तर दर २००० ते २५०० असा होता. गाजराची आवक वाढती असून ती १००० क्विंटलच्या वर पोहोचली आहे. १५०० ते २००० रुपये प्रमाणे याचे व्यवहार होत आहेत.

Market Committee
Agro Idol: स्वत:च स्वत:चे आयडॉल बना

धान्याची स्थिती अशी...
गव्हाची आवक २०० क्विंटल असून २५२० ते २७८८ असा दर मिळाला. तांदळाचे दर २८०० ते ३१०० याप्रमाणे होते तर आवक तीनशे क्विंटल नोंदवली गेली. हरभरा आवक वाढली असून ती २६५ क्विंटलवर पोहोचली आहे. ४३२० ते ४६२० असा दर हरभऱ्याला मिळाला. तुरीची आवक अवघी ७ क्विंटलची झाली.

६२५० ते ६४०० असा दर तुरीला होता. मुगाची आवक १४ क्विंटल तर दर ५४०० ते ५६०० याप्रमाणे मिळाला. उडीद आवक दोन क्विंटलची नोंदविली गेली. ५२०० ते ५४०० असा दर होता. बाजारातील सोयाबीनची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाली. १११४ क्विंटल आवक गेल्या आठवड्यात होती. ती आता ९७३ किलोमीटरवर पोहोचली आहे. ४३६१ ते ५३४६ असा दर सोयाबीनला मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com